Dhanush On Raanjhanaa Climax Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dhanush: 'रांझणा'चा क्लायमॅक्स एआयने बदलल्यामुळे सुपरस्टार धनुषने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, हा तो चित्रपट...

Dhanush On Raanjhanaa Climax: चित्रपट निर्माते आनंद एल राय यांचा 'रांझणा' हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपटांपैकी असून हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे.

Shruti Vilas Kadam

Dhanush On Raanjhanaa Climax: चित्रपट निर्माते आनंद एल राय यांचा 'रांझणा' हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. ज्याने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाचा प्लस पॉइंट म्हणजे त्याची एकतर्फी प्रेमकथा ज्यामुळे सर्वांनाच त्याच्या प्रेमात पाडवेसे वाटते. आता बऱ्याच वर्षांनी त्याचे तमिळ वर्जन पुन्हा प्रदर्शित करण्यात आले, जो एका मोठ्या बदलासह थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.

एआयने क्लायमॅक्स बदलला, धनुष नाराज आहे का?

एआयच्या मदतीने 'रांझणा' चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्यात आला आहे. ज्यामध्ये चित्रपटाचा नायक कुंदन शेवटी जिवंत होतो. तर खऱ्या चित्रपटात त्याचा रुग्णालयातच मृत्यू होतो. ज्यामुळे चित्रपटाची कथा पूर्णपणे खराब झाली. चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. या बदलावर ते अजिबात खूश नव्हते. आता चित्रपटाचा नायक, अभिनेता धनुषनेही बदललेल्या क्लायमॅक्सवर नाराजी व्यक्त केली आहे.

'रांझणा' चित्रपटाच्या बदललेल्या क्लायमॅक्सवर धनुषने त्याच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर एक अधिकृत नोट जारी करून प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता म्हणतो की तो यासाठी त्याची परवानगी नव्हती. पण असे असूनही, चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्यात आला. चित्रपटाच्या पुन्हा प्रदर्शनामुळे तो नाराज आहे. धनुषने लिहिले आहे की, 'रांझणा चित्रपटाच्या पुन्हा प्रदर्शनात एआयने बदललेला क्लायमॅक्स मला आवडला नाही. या नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा मूळ आत्मा नष्ट केला आहे आणि माझ्या स्पष्ट नकारानंतरही हे केले गेले.'

क्लायमॅक्समध्ये बदल, धनुषने काय मागणी केली होती?

धनुषने त्याच्या निवेदनात पुढे चित्रपट आणि त्यांच्या कथांपासून एआयचा वापर दूर ठेवण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काही कठोर नियम बनवावेत असे तो म्हणतो. अभिनेत्याने लिहिले आहे की, 'हा तो चित्रपट नाही ज्याच्याशी मी १२ वर्षांपूर्वी जोडलेला होतो. चित्रपट किंवा आशय बदलण्यासाठी एआयचा वापर करणे कोणत्याही कला आणि कलाकारासाठी चिंतेचा विषय आहे. यामुळे कथा आणि चित्रपटांची विश्वासार्हता खराब होते. भविष्यात अशा कृत्यांना रोखण्यासाठी कठोर नियम बनवावेत अशी माझी इच्छा आहे.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT