Panchayat Actor faisal malik Tragedy: 'पंचायत' या प्रसिद्ध वेब सिरिजमध्ये प्रल्हाद चाची ही भूमिका साकारणारा अभिनेता फैजल मलिकने नुकत्याचं एक मुलाखतीत काळीज पिळवटून टाकणारा अनुभव सांगितला आहे. फैजल म्हणाला की जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा त्याने त्याचे सर्वस्व गमावले. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की त्यावेळी त्याच्या कुटुंबातील ११ सदस्यांचा मृत्यू झाला होता आणि दोन महिन्यांनंतर 'पंचायत २'चे शूटिंग सुरू होणार होते.
वडिलांचे निधन
फैजल मलिकने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "जेव्हा कोविड आला तेव्हा माझे वडील वारले. त्यांच्या दोन महिन्यांपूर्वी अनेक ओळखीच्या लोकांचे निधन झाले होत. त्याचवेळी इरफान सरांचे (इरफान खान) निधन झाले. त्यावेळी दररोज फक्त वाईट बातम्या येत होत्या. शहरही पूर्णपणे बंद होतं. त्यानंतर चित्रपट निर्माते आणि अभिनेता निशिकांत कामत यांचे निधन झाले, ते माझे खूप जवळचे मित्र होते. त्यामुळे मी खूप दुखी होतो आणि त्याचं दरम्यान माझ्या वडिलांचेही निधन झाले. माझे काम सुरु नव्हते, कर्जही वाढत होते."
‘मी दररोज स्मशानात जात होतो’
फैजल पुढे म्हणाला, “बाबांच्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबातील अनेक सदस्यांचे निधन झाले. बाबा, मोठे काका, बाबांचे मित्र, नातेवाईक, मित्र... प्रत्येकाच्या मृत्यूच्या बातम्या एकामागून एक येत होत्या. मला काय चालले आहे ते समजत नव्हते आणि ज्या दिवशी माझे वडील वारले, त्या दिवशी माझ्या भावाला कोविड झाला.
मला भीती वाटत होती कारण त्याला डायबिटीस होता. मी दररोज स्मशानात जात होतो. त्यावेळी लोक कोणाच्याही अंतविधीला जात नव्हते. ते घाबरले होते, पण मी जात होतो. मला वाटले काय होते ते पाहूया. तो काळ खूप वाईट होता. माझ्या मित्रांनी मला आधार दिला नाहीतर मी माझा धीर गमावला असता.