Ashok Saraf canva
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf: बिग बॉस मराठीची जागा घेणार 'अशोक मामा', छोट्या पडद्यावर करणार धमाकेदार एन्ट्री

Ashok Mama Serial New Promo: महाराष्ट्राचा महानायक अशोक सराफ टेलिव्हिजनवर पुन्हा परतणार एक आगळी वेगळी कथा घेऊन प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

Saam Tv

'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित कार्यक्रमाची आज सांगता होत आहे. पण प्रेक्षकांच्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर आता नव्या मनोरंजनाची सुरुवात होणार आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्राचे आवडते अभिनेते, अभिनयसम्राट, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ घेऊन येत आहेत एक नवी मालिका 'अशोक मा.मा.'. महाराष्ट्राचे लाडके आणि जेष्ठ अभिनेते अशोक मामांची ही नवीकोरी मालिका तुफान एंटरटेनिंग असणार यात काही शंका नाही.

महाराष्ट्र भूषण पुरस्कृत अशोक सराफ यांनी 'येतोय महाराष्ट्राचा महानायक' म्हणत 'कलर्स मराठी'ने काही दिवसांपूर्वी 'अशोक मा.मा.' या मालिकेची पहिली झलक काही दिवसांपूर्वी समोर आणली होती. अशातच आता या मालिकेचा उत्सुकता वाढवणारा नवा प्रोमो समोर आला आहे. शिस्तीचं पालन करणारे, काटकसरीचा स्वभाव असणारे, स्वत:च्या निर्णयांवर ठाम असणारे 'अशोक मा.मा.' म्हणजेच अशोक माधव माजगावकर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

बत्तीस वेळा काम सोडून गेलेली मोलकरीण तेहतीसव्यावेळी पुन्हा कामावर येते. त्यावेळी काटकसरी स्वभाव असलेले अशोक मा.मा. मोलकरीन थोडं जास्त वापरत असलेल्या तेलावरून, साबणावरून तिच्यासोबत वाद घालतात. त्यांच्यामधला हा वादाचा आणि गमतीशीर प्रसंग प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतांना दिसतोय. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री नेहा शितोळे या मालिकेमध्ये अशोक मामांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिने वठवलेली मोलकरीण चांगलाच भाव खाऊन जातेय.

'अशोक मा.मा' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी कथा घेऊन महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा सज्ज आहेत. शिस्तप्रिय असणारे 'अशोक मा.मा.' आपल्या मिश्कील अंदाजाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार ऐवढं मात्र नक्की.. 'अशोक मा.मा' या मालिकेचा नवा प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 'अशोक मा.मा.' या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT