Maalik Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Maalik Box Office Collection : 'सुपरमॅन'मुळे 'मालिक'चं गणित बिघडलं, कलेक्शनचा आकडा किती?

Maalik Box Office Collection Day 2 : 'सुपरमॅन' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने 'मालिक' आणि 'आँखों की गुस्ताखियाँ' चित्रपटांना मागे टाकले आहे. एकूण कलेक्शन, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहे. 'स्त्री' आणि 'मेट्रो इन दिनों नंतर आता राजकुमार रावचा 'मालिक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'मालिक' मध्ये राजकुमार ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. राजकुमार चित्रपटात गँगस्टरच्या भूमिकेत झळकला आहे. 'मालिक' (Maalik) हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. राजकुमार रावचा 'मालिक' सिनेमा 11 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'मालिक' चित्रपटासोबतच 11 जुलैला विक्रांत मेस्सीचा 'आँखों की गुस्ताखियाँ' चित्रपट रिलीज झाला आहे. तसेच 'सुपरमॅन' (Superman ) चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'सुपरमॅन' चित्रपटाने कलेक्शमध्ये 'आँखों की गुस्ताखियाँ' आणि 'मालिक' सिनेमांना मागे टाकले आहे. तिन्ही चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'मालिक' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

'मालिक' चित्रपटाने संथ सुरूवात केलेली पाहायला मिळाली आहे. सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 3.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 4.45 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 'मालिक'च्या कमाईत वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांत चित्रपटाने 8.2 कोटी रुपये कलेक्शन केले आहे. आता चित्रपट रविवारी किती कलेक्शन करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'आँखों की गुस्ताखियाँ' कलेक्शन

विक्रांत मेस्सीचा 'आँखों की गुस्ताखियाँ' चित्रपट 11 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी 3 लाख, दुसऱ्या दिवशी 43 लाखांची कमाई केली आहे. चित्रपट अजून 1 कोटी रुपयांचा टप्पा पार करू शकला नाही आहे.

'सुपरमॅन' कलेक्शन

'सुपरमॅन' चित्रपट देखील 11 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत 16 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'सुपरमॅन' चित्रपटाने कलेक्शमध्ये 'आँखों की गुस्ताखियाँ' आणि 'मालिक' सिनेमांना मागे टाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saina Nehwal: सायना नेहवाल - पारूपल्ली कश्यप विभक्त, ७ वर्षांचा सुखी संसार मोडला; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT