आधी मसाला स्प्रे, मग शरीरावर चाकूनं वार, अभिनेत्रीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्यानं केला हल्ला

Actress Husband Attack On Her : प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीवर नवऱ्यानेच हल्ला केल्याची घटना घडली आहे. आता या प्रकरणी मोठे अपडेट समोर आले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Actress Husband Attack On Her
Actress SAAM TV
Published On

मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री मंजुळा श्रुतीवर तिच्या पतीने चाकूने हल्ला केला आहे. मंजुळा श्रुती ही कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मंजुळा श्रुती (Kannada actress Manjula Shruthi) आणि तिच्या नवऱ्यामध्ये आर्थिक समस्या आणि वैवाहिक जीवनात अडचणी वाढल्या होत्या. तसेच मंजुळाच्या पतीला ती आपल्याला फसवत असल्याचा संशय होता. त्या संशयातून त्याने तिच्यावर हल्ला केला. श्रुती सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मंजुळा श्रुतीवर 5 जुलै रोजी पती अमरेशने हल्ला केला. मंजुळाचा पती एक रिक्षा चालक आहे. त्यांच्या लग्नाला 20 वर्ष झाली असून त्यांचा प्रेमविवाह आहे. त्यांना दोन मुलं देखील आहेत. मात्र अलिकडे त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. सतत त्यांची भाडणे होत होती. त्यामुळे मंजुळा आणि तिचा पती तीन महिन्यांपूर्वी वेगळे झाले. मंजुळाने पतीविरुद्ध हुंडा आणि छळ केल्याची तक्रार देखील पोलीसांनी केली होती. श्रुतीवर बंगळुरूमधील राहत्या घरी हल्ला करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

एएनआयच्या माहितीनुसार, श्रुती आणि अमरेशच्या वैवाहिक जीवनात मतभेद असल्याने अमरेशने श्रुतीवर हल्ला केला. मात्र काही दिवसांपूर्वी गुरुवारी हे जोडपे एकत्र भेटले. त्यांच्यात समेट झाला. मात्र दुसऱ्या दिवशी मुलं कॉलेजला गेल्याची संधी साधून अमरेशने श्रुतीवर हल्ला केला. हल्ला करताना अमरेशने प्रथम पेपर स्प्रे मारला. त्यानंतर श्रुतीच्या खांद्यावर, मांडी आणि मानेवर चाकूने वार केले. डोकेसुद्धा भिंतीवर आदळले.

घटनेनंतर लगेच शेजारी तिथे आले आणि त्यांनी भांडण थांबवले. तसेच तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या श्रुती व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार घेत आहे. हनुमंतनगर पोलिसांनी श्रुतीवर हल्ला केल्या प्रकरणी नवऱ्याला ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

Actress Husband Attack On Her
Abdu Rozik : 'बिग बॉस' फेम अब्दु रोजिकवर चोरीचा आरोप, दुबईत केली अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com