Sunny Deol Mehendi Instagram @iamsunnydeols_fan
मनोरंजन बातम्या

Sunny Deol Mehendi Video: सनी देओलची मुलाच्या लग्नात हटके मेहंदी; नेमका अर्थ काय? लोकांची गूगलवर शोधमोहिम

Sunny Deol In Mehendi Ceremony : मेंहदी समारंभादरम्यानचा सनी देओलचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Karan Deol - Drisha Acharya's Pre-Wedding Ceremonies: बॉलिवूड अभिनेता सनी देवोल सध्या चर्चेत आहे. एकीकडे चित्रपटाचे प्रदर्शन तर दुसरीकडे मुलाचं लग्न असं सगळं आनंदी वातावरण सध्या सानी देओलच्या जीवनात आहे. सनी देओलच्या मुलगा करण देवोल लवकरचं लग्नगाठ बांधणार आहे.

करणच्या लग्नाधीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सनी देवोलचा मुलगा करण देवोल येत्या १८ जूनला द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधणार आहे. संपूर्ण देओल कुटुंब लग्नाचा आनंद साजरा करत आहेत. लग्नासाठी संपूर्ण देवोल कुंटुंब उपस्ठित राहणार आहे. (Latest Entertainment Video)

लग्नाआधीच्या समारंभाना सुरूवात झाली आहे. या समारंभाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच सनी देवोलचा मुलाच्या लग्नसमारंभात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

करण देओल- द्रिशा यांचा मेंहदी समारंभ देखील पार पडला. यासाठी संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. या मेंहदी समारंभादरम्यानचा सनी देओलचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सनी देवोल आपल्या मुलाच्या लग्नाचा आनंद घेताना दिसत आहे. करण देवोलने द्रिशाची नावाची मेंहदी काढली आहे.

तर करणच्या मेहेंदीत सनी देओलच्या हातावरची मेंहदी चर्चेचा विषय ठरली आहे. सनी देओलच्या हातावर हिंदू ,मुस्लीम ,सीख , ख्रिश्चन अशा सर्व धर्मांची चिन्ह काढली आहेत. या मेंहदीतून सनी देओलने 'सर्वधर्म समभाव' हा संदेश दिल्याचे नेटकरी आणि त्याचे चाहते म्हणते आहते. यामुळे सनी देओलचा सगळीकडे कौतुक होत आहे.

सनी देओलने मेंहदी समारंभासाठी गुलाबी रंगाचे शर्ट घातला होता. सनी देवोल सध्या मुलाच्या लग्नात व्यस्त आहे. मुलाच्या लग्नात हौस करण्याची एकही संधी सनी देओल सोडत नाही. हा सनी देवोलसाठी खुप आनंदाचा क्षण आहे असे त्याने सांगितले आहे. धर्मेंद्र, बॉबी देओल, अभय देओल देखील सनी देओलसोबत लग्न सोहळाच्या आनंद घेताना दिसत आहेत.

सनी देवोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर त्याचा 'गदर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गदर २' च्या प्रमोशनसाठी 'गदर एक प्रेम कथा' चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. गदर चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला आहे. तर आता 'गदर २' साठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

SCROLL FOR NEXT