Sunny Deol Jaat Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaat Movie: सनी देओलच्या 'जाट' चित्रपटावर एफआयआर दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर आरोप

Sunny Deol Jaat Movie: बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'जाट' हा चित्रपट प्रदर्शित होऊन ९ दिवस झाले आहे. परंतु, या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून चित्रपटावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Jaat Movie: बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'जाट' या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून, पंजाबच्या जालंधरमध्ये अभिनेता आणि चित्रपटाच्या टीमविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. चित्रपटातील एका दृश्यामुळे ख्रिश्चन समुदायाने या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.​

या प्रकरणात सनी देओल, रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंह, दिग्दर्शक गोपीचंद आणि निर्माता नवीन यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस)च्या कलम 299 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जालंधरच्या फोलडीवाल गावातील रहिवासी विकल्प गोल्ड यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.​

विवादित दृश्यात रणदीप हुड्डा, जो या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहेत तो चर्चच्या पवित्र वेदीसमोर उभे आहे आणि अन्य सभासद प्रार्थना करत असताना चर्चच्या आत गुंडगिरी आणि धमकीचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत, त्यामुळे ख्रिश्चन समुदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या दृश्याचा एक भाग चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दिसतो.​

'जाट' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून, पहिल्या आठवड्यात 61 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तथापि, या वादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच नुकताच अक्षय कुमारचा केसरी चॅप्टर २ प्रदर्शित झाल्यामुळे या चित्रपटाच्या कलेक्शनवर आणखी परिणाम होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यमुना नदीचं पाणी घरात शिरलं - मथुरा

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

SCROLL FOR NEXT