Bollywood Actor saam tv
मनोरंजन बातम्या

Govinda : पत्नी सुनीता गोविंदापासून लांब का राहते? रोमॅंटिक नेचरबाबत सांगत केला मोठा खुलासा

Bollywood Actor : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता म्हणजे गोविंदा आहूजा. त्याच्यासोबत त्याची पत्नीसुद्धा तिच्या वेगळ्या अंदाजाने लोकांच्या मनात घर करून राहीली आहे.

Saam Tv

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता म्हणजे गोविंदा आहूजा. त्याच्यासोबत त्याची पत्नीसुद्धा तिच्या वेगळ्या अंदाजाने लोकांच्या मनात घर करून राहीली आहे. त्याच्या पत्नीच नाव सुनीता आहूजा आहे. हिने नुकत्याच एका इंटरव्ह्यूमध्ये गोविंदा आणि तीच्या रिलेशनशिप बद्दल चर्चा केली. त्यात ती गोविंदासोबत राहत नाही असं स्पष्ट मत तिने व्यक्त केलं. याच मुख्य कारणं सुद्धा तीने इंटरव्ह्यूमध्ये सांगितल आहे.

गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता हे दोघे वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात. मात्र त्यांच्यात कोणताच दुरावा नाही. या दोघांच वेगळं राहण्याच कारण म्हणजे त्यांच डेली रुटीन आहे. सुनीताने बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये हे सांगितलं आहे की, त्यांची दोन घरं आहेत. त्यांचा एक बंगला त्यांच्या अपार्टमेंटच्या समोर आहे आणि ती फ्लॅटमध्ये तिच्या मुलांसोबत राहते. अभिनेता गोविंदा हा कधीकधी रात्रभर कामाच्या मिटींगमध्ये राहतो त्यामुळे तो वेगळ्या बंगल्यात राहतो.

अभिनेता गोविंदा हा लोकांशी बराच वेळ गप्पा मारतो. हा मुळात त्याचा स्वभाव आहे. तर दुसरीकडे मुलांना फार बोलायला आवडत नाही म्हणून तो वेगळ्या बंगल्यात राहून काम किंवा मिटींग करत असतो. हे सांगत असताना त्याची पत्नी म्हणाली की, 'गोविंदा बऱ्याच वेळेस उशीरा येतो. त्यामुळे आमची झोपमोड होऊ नये म्हणून तो वेगळ्या बंगल्यात राहतो. त्याला बोलायला खूप आवडतं.'

गोविंदाच्या रोमॅंटिक नेचरवर प्रश्न विचारले असता, त्याची पत्नी म्हणाली, 'गोविंदा मला वेळ देत नाही, मला बाहेर फिरायला घेऊन जात नाही, मला कधीच मुव्हीला घेऊन जात नाही, तो कामाला येवढे प्राधान्य देतो की, त्यात मला विसरून जातो, म्हणून मला हा पुढच्या जन्मात नवरा म्हणून नको!' असे ही तिने म्हटले. गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला ३७ वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यांना टिना आणि यशवर्धन ही दोन मुलं आहेत.


Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT