
Kalki 2 : नाग अश्विनच्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ होती. लोकांना हा सायन्स फिक्शन चित्रपट खूप आवडला आणि चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने करोडो रुपये कमावले. कल्कीमध्ये प्रभास कर्णाच्या भूमिकेत तर अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या शेवटी, आपल्याला भगवान कृष्णाची झलक दिसते, तेव्हापासूनच कल्किच्या दुसऱ्या भागात कृष्णाची भूमिका कोण साकारणार याची चर्चा सुरू झाली. व्हायरल व्हिडीओमध्ये नाग अश्विनने चाहत्यांच्या या प्रश्नांना उत्तरे देऊन अटकळांना पूर्णविराम दिला आहे.
वास्तविक, 'कल्कि 2898 एडी'च्या यशानंतर, भाग 2 चे शूटिंग कधी सुरू होणार आणि तो कधी रिलीज होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहते वाट पाहत आहेत. या संदर्भात नाग अश्विनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना त्याने 'कल्की पार्ट 2' मध्ये कृष्णाच्या भूमिकेत कोण दिसणार आहे याचा खुलासा केला आहे.
महेश बाबू खरोखरच सामील होणार 'कल्कि 2'!
व्हायरल व्हिडिओमधील एका संभाषणादरम्यान, नाग अश्विन म्हणले, “मला कल्कि ब्रह्मांडमध्ये भगवान कृष्णाचा चेहरा दाखवायचा नव्हता. पण पुढील भागात ही भूमिका मोठी असणार आहे त्यामुळे श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी महेश बाबू परफेक्ट असतील असं मला वाटतं. याशिवाय, जर या चित्रपटाच्या चाहत्यांना हवे असेल तर कल्कि 2 देखील सर्वकालीन ब्लॉकबस्टर बनेल. मला विश्वास आहे की कल्कि 2 देखील बंपर कमाई करेल.
नाग अश्विन पुढे म्हणले, “मला खलेजा चित्रपटात महेश बाबू खूप आवडला होता. जर आपण त्याची कृष्णाच्या भूमिकेत कल्पना केली तर मला खात्री आहे की तो ती भूमिका चांगल्या प्रकारे साकारेल.” महेश बाबू सध्या राजामौली यांच्या आगामी चित्रपटात काम करत आहेत.
कल्कि 2 भारतीय सिनेमातील सर्वात मोठी कास्टिंग असेल!
महेश बाबूबद्दल सांगायचे तर, त्याने आतापर्यंत कोणत्याही पौराणिक चित्रपटात भूमिका केलेली नाही, त्याने पहिल्यांदा 'खलेजा'मध्ये देवाची भूमिका केली होती. कल्कीच्या दुसऱ्या भागात महेश बाबूच्या सहभागाचे कोणतेही संकेत नाहीत. पण असे झाल्यास भारतीय चित्रपटसृष्टीतील ही सर्वात मोठी कास्टिंग असेल. कारण प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हसन यांसारखे दिग्गज कलाकार याआधी 'कल्कि 2898 एडी'मध्ये दिसले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.