Govinda Saam Tv
मनोरंजन बातम्या

Govinda: गोविंदाच्या डोक्यावर नाहीत केस; पत्नी सुनिता पोलखोल करत म्हणाली, 'राजा बाबू वापरतात हेअर पॅच...'

Govinda: सुनिता आहुजांने एक मुलाखतीत गोविंदाच्या हेअर पॅचबाबत मोकळेपणाने भाष्य केले आहे. तिने सांगितले यामध्ये लपवण्यासारखे काही नसून प्रत्येक सेलिब्रिटी या पॅचचा वापर करतात.

Shruti Vilas Kadam

Govinda: बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा ही तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता या संपूर्ण प्रकरणावर सुनिताने यावर आता सविस्तर प्रतिक्रिया देत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान गोविंदा यांचा उल्लेख ‘GOAT’ असा करण्यात आला होता. मात्र, या शब्दाचा अर्थ सुनिताला माहित नसल्याने तिने त्यावर वेगळी प्रतिक्रिया दिली. GOAT म्हणजे ‘Greatest Of All Time’ असा अर्थ होतो. परंतु त्यावेळी सुनिताला हा अर्थ माहित नव्हता आणि तिने तो शब्द ‘शेळी’ किंवा ‘बोकड’ असा समजला होता.

या घटनेची आठवण सांगताना सुनिता म्हणाल्या, “मी तेव्हा म्हणाले होते की माझे पती काही शेळी किंवा बोकड नाहीत. खरं तर मला असे म्हणायचे होते की ते सिंहासारखे आहेत. त्यावेळी GOAT चा खरा अर्थ मला माहित नव्हता. “जर मला याचा अर्थ आधीच माहित असता, तर मी स्वतःच गोविंदाला GOAT म्हटले असते. त्याच्या तोडीचा अभिनेता आजही नाही.”

या मुलाखतीत सुनिताने गोविंदाबद्दल आणखी एक खास खुलासा केला. त्यांच्या पहिल्या भेटीच्या आठवणी सांगताना सुनिताने गोविंदाच्या दिसण्याचं कौतुक केलं. सुनिता म्हणाली “तो आजही खूप देखणे दिसतात, फरक फक्त एवढाचं की त्यावेळी त्याचे नॅचरल केस होते. आता तो हेअर पॅच वापरतो,” असे त्या हसत म्हणाल्या

दरम्यान, सुनिता आहुजा लवकरच रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहे. त्या ‘लॉक अप’च्या दुसऱ्या भागात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. तसेच मुलगी टीना आहुजासोबत ती एका नव्या रिअॅलिटी शोमध्येही दिसणार आहेत. त्यामुळे आगामी काळात सुनिता आहुजा पुन्हा एकदा सोशल मिडियावर ट्रेंड करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark elbow and knee : कोपर-गुडघ्यांचा काळेपणा कमी करायचाय? स्किन केअरमध्ये या ६ गोष्टी नक्की करा

22k Gold Mangalsutra: लाडक्या बायकोसाठी 22 कॅरेट सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये बंजारा समाजाचा पारंपरिक तीज उत्सव उत्साहात संपन्न

Weight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी सकाळी प्यायला उपयुक्त 7 हेल्दी ड्रिंक्स; जाणून घ्या फायदे

Ola-Uber चालकांसह डिलिव्हरी बॉयंसाठी मोठी बातमी! मिळणार सामाजिक सुरक्षेचं कवच, असा होणार फायदा

SCROLL FOR NEXT