Sunil Grover
Sunil Grover  Instagram @whosunilgrover
मनोरंजन बातम्या

Sunil Grover: अखेर इतक्या वर्षांनी सुनील ग्रोव्हरने मौन सोडले; म्हणाला 'मी पुन्हा त्यांच्यासोबत काम करणार असे ...'

Pooja Dange

Sunil Grover Spoke About Tragedy: कॉमेडियन सुनील ग्रोव्हर 'युनायटेड कच्चे' या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे. सुनीलने 'द कपिल शर्मा शो'मधून बाहेर पडून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यानंतर त्याने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले.

2017 मध्ये सुनील आणि कपिल शर्मा यांच्यातील वाद समोर आला. तेव्हापासून सुनील चर्चेत आला होता. अलीकडेच सुनीलने त्याला काहीही न सांगता शोमधून 'रिप्लेस' केल्याचा धक्कादायक खुलासा केला.

तांडवमध्ये गंभीर भूमिका साकारलेल्या सुनीलने कपिल शर्मा शोमध्ये गुत्थीपासून रिंकू भाभीपर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या चाहत्यांना त्याची बॉलिवूड सेलिब्रिटींची मिमिक्री, होस्टिंग कौशल्ये आणि कॉमिक टाइमिंग आवडते. सुनील या शोचा भाग नसल्याची घोषणा झाल्यावर ते खूपच निराश झाले.

अलीकडेच ETimes शी बोलताना सुनील ग्रोव्हरने कोणत्याही विशिष्ट शोचे नाव घेतले नाही परंत अचानक या शोमधून बाहेर पडल्याबद्दल का पडलं हे सांगितलं आहे. सुनील म्हणाला, “एक शो होता ज्यामध्ये माझ्या बदली दुसरा कलाकार घेतला होता आणि ३ दिवस मला याविषयी सांगितले देखील नव्हते. लोकांकडून मला याविषयी कळले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे माझ्या मनावर परिणाम झाला."

सुनील ग्रोव्हर पुढे म्हणाला, “मला स्वतःविषयी प्रचंड आत्म-शंका निर्माण झाली, मला वाटायचे की, मला पुन्हा तिथे जाऊ शकत नाही, त्या लोकांसोबत शूटिंग करू शकेन की नाही. त्यानंतर जवळजवळ एक महिना मी एका शेलमध्ये गेलो.” सुनील पुढे म्हणाला, “मग मला वाटले की कदाचित मी हे करू शकणार नाही, त्यानंतर मी हट्टाला पेटलो आणि म्हटलं ‘चल कोई नहीं… एक बार और कोशिश करता है’ आणि कमला लागलो.

सुनीलने रिअॅलिटी शोमध्ये अनेक कलाकारांच्या भूमिका साकारल्या होत्या. द कपिल शर्मा शो मधून बाहेर पडल्यानंतर बॉलिवूड अवॉर्ड शोमध्ये अनेक गिग्स सादर केले. सुनीलने 2018 मध्ये विशाल भारद्वाजच्या पटाखामध्ये डिपर आणि 2021 मध्ये तांडवमध्ये गुरपालची भूमिका केली होती.

सुनील ग्रोव्हरचे इंस्टाग्रामवर 6 दशलक्ष फॉलोअर्सचा मोठा चाहता वर्ग आहे. याबद्दल बोलत असताना, अभिनेत्याने नम्रपणे सांगितले की, कोणाच्याही सोशल मीडिया फॉलो काउंटने कोणाची योग्यता ठरत नाही. “मी विनंती करतो की कृपया किती फॉलोअर्स आहेत, किती कॉमेंट्स आहेत यावरून स्वतःची किंमत ठरवू नका. कृपया असे करू नका. मी लोकांना यामुळे डिप्रेशमध्ये केलेले पाहिले आहे.”

सुनीलचा 'युनायटेड कच्चे' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर सुनील, शाहरुख खान स्टारर 'जवान' या चित्रपटात दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangali News: सांगली, पुण्यासह ५ रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; संशयित आरोपीला मुंबईतून अटक

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

SCROLL FOR NEXT