Sunil Grover Viral Post  Instagram @whosunilgrover
मनोरंजन बातम्या

Sunil Grover:भारत अनेक पिढ्यांपासून अर्जेंटिनाला सर्पोट करतोय; सुनील ग्रोव्हरने शेअर केलेला कॉमेडी फोटो पाहून तुम्हीही मान्य कराल!

सुनील ग्रोव्हरने फिफा वर्ल्ड कपवर एक विनोदी पोस्ट शेअर केली आहे.

Pooja Dange

Sunil Grover Post On FIFA World Cup: विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हरला कधी काय सुचेल याचा नेम नाही. रविवारी फिफा वर्ल्ड कप २०२२चा अंतिम सामना पार पडला. या सामना अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स असा होता. दोन्ही टीम चांगली कामगिरी केली. परंतु अखेर अर्जेंटिनाने यावर्षीच्या विश्वचषकावर स्वतःचे नाव कोरले. जगभरातील सर्वच फॅन्स अर्जेंटिनाच्या या विजयावर खूप खुश आहेत. त्यात भारतीय फॅन्सचा सुद्धा समावेश आहे. यावर सुनील ग्रोव्हर याने एक विनोदी पोस्ट शेअर केली आहे.

सुनील ग्रोव्हरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तसेच फोटो शेअर करत म्हटले आहे की, आपण गेली अनेक पिढयांपासून अर्जेंटिनाला सपोर्ट करत आहोत. परंतु त्याने जे शेअर केलं आहे तेच खूप विनोदी आहे. सुनीलने सफेद आणि निळ्या रंगाचे पट्टे असलेल्या बरमोड्याचा फोटो पोस्ट केला आहे. (Fifa)

तसेच त्याने म्हटले आहे की, तुम्ही कधी ना कधी तुमच्या घरातील कोणाला तरी या बरमोड्यावर पहिले असेल. सफेद आणि निळे पट्टे असलेला या बरमोडा अर्जेंटिनाच्या जर्सीशी मिळता-जुळता आहे. सुनीलची ही पोस्ट पाहून तुम्ही स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाही.

अभिनेता सुनील व्यासने कमेंट केली आहे की, 'हाहाहाहा, माझ्या पंजोबांना त्यांच्यावर विश्वास होता.' तर सुनेच्या एका चाहत्याने लिहिले आहे, माझ्या आजोबांना आजीवन त्यांना सपोर्ट केला आहे.' तर एका नेटकाऱ्याने लिहिले आहे, शक्ती कापूरनंतर डॉक्टर गुलाटीने याला फेमस केले आहे. मिस यु सुनील सर' तर काही युजर्स असे म्हणत आहेत सुनीलने अर्जेंटिनाच्या झेंड्याची अशी मस्करी करू नये. (Social Media)

सुनील ग्रोव्हर 'गुडबाय' या चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटामध्ये सुनीलने पंडितची भूमिका साकारली होती. सुनील ग्रोव्हर शाहरुख खानच्या जवान चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT