Suniel Shetty On Marathi Language Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suniel Shetty: 'मला मराठी बोलता आलेच पाहिजे...'; अभिनेता सुनील शेट्टीची मराठी भाषेसाठी परखड भूमिका

Suniel Shetty On Marathi Language: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनी नुकतीच शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठी भाषेबाबत ठाम आणि परखड भूमिका मांडली.

Shruti Vilas Kadam

सचिन बनसोड

Suniel Shetty : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनी नुकतीच शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठी भाषेबाबत ठाम आणि परखड भूमिका मांडली. “माझी जन्मभूमी कर्नाटक असली तरी कर्मभूमी मुंबई आहे. इथे राहून मला मराठी बोलता आलेच पाहिजे,” असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सरकारने शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीबाबत विविध वाद रंगत असताना, सुनील शेट्टी यांचे हे वक्तव्य विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांनी केवळ मराठी भाषेबद्दल आपली भावना व्यक्त केली नाही, तर मुंबईसारख्या महानगरातील भाषिक एकात्मतेचा आदरही दर्शवला.

माध्यमांशी संवाद साधताना सुनील शेट्टी म्हणाले, “मी ज्या शहरात राहतो, तिथली भाषा, संस्कृती समजून घेणं आणि तिचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे. मराठी ही खूप सुंदर भाषा आहे आणि मला ती येणं आवश्यक आहे.”

सुनील शेट्टीने साईदर्शनाच्या वेळी समाधी मंदिरात काही वेळ शांततेत व्यतीत केला. मंदिराच्या विश्वस्त संस्थेकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी भाविकांप्रमाणे साईबाबांची आरतीही अनुभवली. राज्यात सध्या भाषिक भावना अधिकच तीव्र होत असताना, एका लोकप्रिय कलाकाराने अशी समजूतदार आणि संतुलित भूमिका घेणं समाजात सकारात्मकतेचा संदेश देणारं ठरतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT