Priyanka Chopra: 'ती खूप लहान होती...'; शेफाली जरीवालाच्या निधनाने प्रियांका चोप्राला बसला धक्का

Priyanka Chopra on Shefali Jariwala Death: रविवारी, शेफाली जरीवालाच्या अस्थींचे मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर विसर्जन करण्यात आले. कुटुंबासह, शेफालीचे इतर प्रियजन आणि हितचिंतक यावेळी जमले होते.
Priyanka Chopra on Shefali Jariwala Death
Priyanka Chopra on Shefali Jariwala DeathSaam Tv
Published On

Priyanka Chopra on Shefali Jariwala Death: टीव्ही अभिनेत्री शेफाली जरीवाला ही चाहत्यांसाठी 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखत होती. या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमुळे शेफालीला रातोरात ओळख मिळाली. शेफालीने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. आज शेफालीच्या निधनाच्या बातमीने चाहतेच नव्हे तर स्टार्सनाही धक्का बसला आहे.

शेफाली जरीवाला आता या जगात नाहीये यावर अजूनही कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. २७ जूनच्या रात्री अचानक छातीत दुखण्याने शेफालीचे निधन झाले. शेफालीच्या निधनाने अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासला देखील धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या अचानक निधनाबद्दल प्रियांकाने दुःख व्यक्त केले आहे.

Priyanka Chopra on Shefali Jariwala Death
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: 'क्योंकी सास भी कभी बहू थी २'ची प्रदर्शन तारिख बदलली; मिहिरने सांगितले लाँच रद्द करण्याचे कारण

शेफालीच्या निधनाने प्रियांका दु:खी

'मुझसे शादी करोगी' चित्रपटात प्रियांका चोप्रा जोनास आणि शेफाली जरीवाला यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. अवघ्या ४२ वर्षीय शेफालीच्या निधनाच्या बातमीने प्रियांका देखील धक्का बसली आहे. प्रियांकाने रविवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेफालीचा एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत अभिनेत्रीने लिहिले, "खूप दुःख झाले. ती खूप लहान होती. पराग आणि कुटुंबियांना सांत्वन." प्रियांकाच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Priyanka Chopra on Shefali Jariwala Death
Aamir khan: 'मला मराठी भाषा येत नाही, याची...'; आमिर खान असं का म्हणाला? पाहा व्हिडिओ

शेफाली जरीवाला अस्थी विसर्जनानंतर पराग त्यागी रडला

रविवारी मुंबईतील जुहू बीचवर शेफाली जरीवालाच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, शेफालीचे इतर प्रियजन आणि हितचिंतक यावेळी जमले होते. अभिनेत्रीचा पती पराग त्यागी यावेळी खूप रडताना दिसत होता. अस्थी विसर्जनादरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com