सुनील शेट्टी बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आहे. अभिनेता, निर्माता आणि उद्योजक असे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व म्हणून सुनील शेट्टींना ओळखले जाते. सुनील शेट्टी हे नेहमीच चर्चेत असतात.
गेली तीन दशके प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणारा सुनील शेट्टी आज स्वतः चा ६२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुनील शेट्टी चित्रपटाप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही हिरो आहे. त्याच्या दिलदारपणाचा हा एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सुनील शेट्टीचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ मध्ये झाला. आतापर्यंत १०० चिपटांहून अधिक चित्रपट त्याने केले आहे. वयाच्या ३१ व्या वर्षी त्याने 'बलवान' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर सुनील शेट्टीने कधी मागे वळून पाहिले नाही.
सुनील शेट्टी हा दिलदार माणूस आहे. इंडस्ट्रीतील खूप लोकांना सुनील शेट्टींने मदत केली आहे. सुनील शेट्टीने बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खानला त्याच्या वाईट काळात मदत केली. त्याच्या या स्वभावामुळेच त्याने नेहमी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
एकदा एका पुरस्कार सोहळ्यात सलमान खानला तुझ्या आयुष्यातील सर्वात जास्त अविस्मरणीय क्षण काय? असे विचारले होते. त्यावर तो म्हणाला की, 'एक वेळ होती जेव्हा माझ्याकडे फार पैसे नव्हते. मी सुनील शेट्टी म्हणजेच अण्णाच्या दुकानात गेलो.
ते महागडे दुकान होते. त्यामुळे एका शर्टपेक्षा जास्त काही विकत घेण्याची ऐपत नव्हती. तेव्हा सुनील शेट्टीने पाहिले की, माझ्याकडे पैसे नाही. तेव्हा त्याने मला एक शर्ट गिफ्ट म्हणून दिले. त्यानंतर माझी नजर एका पर्सवर गेली. यानंतर सुनील शेट्टी मला त्याच्या घरी घेऊन गेले आणि मला एक ती पर्स दिली'. हा प्रसंग सांगताना सलमान खानचे अश्रू अनावर झाले होते.
सलमान खानला मदत करणारा सुनील शेट्टी माणूस म्हणून खूप दिलदार आहे. सुनील शेट्टी 'धडकन' चित्रपटातील खलनायकच्या भूमिकेमुळे खूप प्रसिद्ध झाला. त्यानंतर 'फिर हेरा फेरी' या चित्रपटातील सुनील शेट्टीची कॉमेडी आजही प्रेक्षकांन आठवते. प्रेक्षकांनी 'हेरा फेरी'च्या सिक्वेलची मागणी केली होती. तर आता सुनील शेट्टीचा 'हेरा फेरी 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.