Suniel Shetty Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suniel Shetty: मोठ्या मनाचा सुनिल शेट्टी, कास्टिंग डायरेक्टरला गिफ्ट केला बंगला, नेमकं कारण काय?

Suniel Shetty Gave Bunglow To Casting Director: सुनील शेट्टीची लेक अथियाने हिरो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या कास्टिंग दिग्दर्शकाला सुनील शेट्टीने मोठं गिफ्ट दिले होते.

Siddhi Hande

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतात. सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टीदेखील उत्तम अभिनेत्री आहे. अथिया शेट्टीने हिरो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या कास्टिंग दिग्दर्शकाला सुनील शेट्टीने बंगला गिफ्ट दिला होता. त्यामुळे अथिया शेट्टीला चित्रपटात घ्यावं, यासाठी सुनी शेट्टीने हे गिफ्ट दिल्याच्या चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.

'हिरो' चित्रपटाचे कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी एका पॉडकास्टमध्ये हा किस्सा सांगितला आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा सुनील शेट्टीची मुलगी अथियाची हिरो चित्रपटासाठी निवड झाली तेव्हा सुनील शेट्टीने त्याला ऑफिससाठी बंगला गिफ्ट केला होता. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुकेशने पॉडकास्टमध्ये सांगितले की, जेव्हा मी कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. त्यावेळी सुरुवातीच्या काळात सुनील शेट्टीने मला मदत केली. त्यांचा आराम नगरला १६० नंबरचा बंगला होता. त्यांनी तो बंगला मला ऑफिससाठी दिले होते.त्यावेळी मी सुनील शेट्टीची मुलगी अथियासोबत काम करत होते. त्यावेळी सुनील शेट्टी मला म्हणाले की, तू खूप लहान ऑफिसमध्ये काम करतो. माझा आराम नगरमधील बंगला तू ऑफिस म्हणून वापर. तू फक्त चांगलं काम कर. भाड्याविषयी आजिबात काळजी करु नको.तू माझ्या मुलीसाठी एवढं केलं, तर प्लीज हा बंगला वापर, असं म्हणत त्यांनी मला हा बंगला वापरण्यासाठी दिला.

सुनील शेट्टीची लेक अथियाने 'हिरो' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. या चित्रपटात सूरज पांचोली मुख्य भूमिकेत होता. अथियाने यानंतर 'मुबारका', 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT