Sabar Bonda Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sabar Bonda: 'मायदेशात चित्रपट प्रदर्शित होणं...'; आंतरराष्ट्रीय यशानंतर 'साबर बोंड' चित्रपट लवकरच होणार भारतात प्रदर्शित

Sabar Bonda Movie: रोहन परशुराम कानवडे लिखित व दिग्दर्शित सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड ज्युरी प्राईज जिंकणारा मराठी चित्रपट ‘साबर बोंड' लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Sabar Bonda Movie: रोहन परशुराम कानवडे लिखित व दिग्दर्शित, तसेच सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड ज्युरी प्राईज जिंकणारा मराठी चित्रपट ‘साबर बोंड (कॅक्टस पिअर्स)’ लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे वितरण अभिनेता राणा दग्गुबती यांच्या स्पिरिट मीडियामार्फत करण्यात येणार आहे.

साबर बोंड’ हा शहरात राहणाऱ्या आनंदची कथेला या चित्रपटात मांडण्यात आली आहे. जो वैयक्तिक दुःख व कौटुंबिक दबावांमुळे आपल्या गावात दहा दिवसांच्या शोकविधीसाठी परततो. या काळात त्याला बालपणीच्या मित्राकडून आधार मिळतो. भूषण मनोज, सुरज सुमन आणि जयश्री जगताप यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात वैयक्तिक नातेसंबंधांची गुंतागुंत आणि प्रामाणिकपणाला सामोरे जाण्याचे धैर्य यावर आधारित आहे.

हा चित्रपट सनडान्समध्ये पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय काल्पनिक चित्रपट ठरला आहे. तसेच सनडान्समध्ये प्रीमियर होणारा पहिला मराठी भाषिक चित्रपट आहे. आतापर्यंत २५ हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित होऊन या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड प्रशंसा मिळवली आहे.

दिग्दर्शक रोहन कानवडे म्हणाले, “जगभरात मिळालेल्या प्रतिसादानंतर आपल्या मायदेशात चित्रपट प्रदर्शित होणं हे वेगळं समाधान आहे.” राणा दग्गुबतींच्या मते, “‘साबर बोंड’ भारतीय प्रेक्षकांच्या मनाला भिडेल आणि मराठी सिनेमाला जागतिक स्तरावर नवीन ओळख मिळवून देईल.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025: नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील नकारात्मक वस्तू काढा, नाहीतर येतील अनेक अडथळे

Vastu Tips For Money: घरात कासवाची मूर्ती ठेवल्याने कोणते लाभ होतात?

Pulao Recipe : साहित्य कमी मात्र रेसिपी चवदार, झटपट बनवा 'हा' चटपटीत पुलाव

Maharashtra Live News Update: वाशिम सह रिसोड,मालेगांव तालुक्याला पावसाने झोडपलं

Empty Stomach: रात्री उपाशीपोटी झोपल्याने भोगावे लागतील 'हे' दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT