Shilpa Shetty Shared Happy Married Life Tips Instagram
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty Shared Happy Married Life Tips: शिल्पा शेट्टीने चाहत्यांना दिला वैवाहिक जीवानाचा मंत्र, तुम्हीसुद्धा फॉलो करा ‘या’ टिप्स...

Shilpa Shetty News: शिल्पा शेट्टीने सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Chetan Bodke

Shilpa Shetty Shared Happy Married Life Tips

बॉलिवूडची फिटनेस क्विन शिल्पा शेट्टी कुंद्रा कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती अनेकदा चाहत्यांसोबत फिटनेसविषयी महत्वपूर्ण माहिती शेअर करत असते. यावेळी अभिनेत्री तिच्या फिटनेसमुळे नाही तर, तिच्या आगामी चित्रपटामुळे ती चर्चेत आली आहे. येत्या २२ सप्टेंबरला शिल्पाचा ‘सुखी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या अभिनेत्री प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच अभिनेत्रीने एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत शिल्पा शेट्टीने सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी 'सुखी' चित्रपटात एका मध्यम वर्गीय पंजाबी गहिणीची भूमिका साकारली आहे. ती मध्यम वर्गीय महिला पती आणि मुलांची काळजी घेण्यामध्ये स्वत:चं आयुष्यच जगायला विसरते. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग वेळी शिल्पा शेट्टी म्हणाली की, “पिढ्यांपिढ्या महिलांना नेहमीच घरातील कोंबडी मानण्यात आलं आहे. विशेषत: पत्नीच्या बाबतीत. पण, पती-पत्नी दोघांनी एकमेकांची थोडी काळजी घेतल्यास वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते.” (Actress)

पुढे मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “आपण कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातून असो किंवा उच्चवर्गीय कुटुंबातील असो. सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे पती-पत्नीमधील विश्वास आणि मैत्रीचे नाते. पती-पत्नीमध्ये विश्वासाचे आणि मैत्रीचे नाते असावे. पण अनेक वेळा पती-पत्नीच्या नात्याचे महत्त्व आपल्याला समजत नाही. पत्नी ही घरातील कोंबडी सारखीच आहे अशी भावना पतीच्या मनात असते. इथूनच नात्यांमध्ये कटुता सुरू होते.” (Bollywood Film)

सुखी वैवाहिक जीवनाचा मूळ मंत्र सांगताना शिल्पा शेट्टी म्हणाली, “पतीने कायमच पत्नीला तिच्या कामात मदत करायला हवी, तरच आपलं वैवाहिक जीवन सुखी होईल. ही जरी अतिशय साधी बाब असली तरी, ती बाब आपले जीवन गुंतागुंतीचे करते. मोठे स्वप्न पाहण्याच्या नादात आपण छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो.”

शिल्पा शेट्टी आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या भागात म्हणाली, “राज कुंद्राचं आणि माझं आयुष्य खूप साधं आहे. आमची विचारसरणी मध्यमवर्गीय आहे. आम्हाला दोघांनाही मध्यमवर्गीयांच्या कौटुंबिक मूल्यांची जाण आहे. आम्ही मुलांसोबत एकत्र जेवायला बसतो. अशा अनेक मुलभूत गोष्टी पाहून आम्ही लहानाचे मोठे झालेय. आमच्या सुखी वैवाहिक जीवनाच्या यशाचा हा मुख्य मंत्र आहे.” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT