Biopic On Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा जीवनप्रवास घरोघरी पोहोचणार, लवकरच येणार चित्रपट; तारीखही ठरली

Sangharsh Yodha Manoj Jarange Patil Movie: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Biopic On Manoj Jarange
Biopic On Manoj JarangeSaam Tv
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर

Jalna Maratha Protest:

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं हा मुद्दा उचलून धरून जालन्यामध्ये उपोषणाला बसलेल्या मनोजर जरांगे यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

डी गोवर्धन दोलताडे यांनी हा चित्रपट तयार करण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये मनोज जरांगे यांचा जीवनप्रवास, मराठा आंदोलनात त्यांची भूमिका आणि आता सध्या त्यांचे सुरु असलेले उपोषण हे चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

Biopic On Manoj Jarange
Kedar Shinde Instagram Post: '...पण खरं सांगू? कुठेतरी थांबायला हवं', केदार शिंदेंची 'ती' पोस्ट चर्चेत, असं का म्हणाले?

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोर जरांगे यांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे. 'संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील' असं या चित्रपटाचे नाव असणार आहे. यासाठी खळग चित्रपटाची टीम मनोज जरांगे यांच्या भेटीला आली आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटात स्वतः मनोज जरांगे पाटील हे भूमिका साकारणार आहेत. निर्माते डी गोवर्धन दोलताडे हे हा चित्रपट तयार करणार आहेत. तर शिवाजी दोलताडे हे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या शुटिंग कधीपासून सुरु होणार आहे याबाबत देखील माहिती सांगण्यात आली आहे. डिसेंबर २०२३ पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

Biopic On Manoj Jarange
Pakistani Actress Slams Kangana Ranaut: ‘कंगनाच्या कानाखाली मारायची आहे’; पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा

दरम्यान, जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले होते. याचवेळी मराठा आंदोलकांवर (Maratha Protester) पोलिसांनी (Jalna Police) लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जच्या वेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुक्काबुकी झाली होती.

यामध्ये ८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन, बंद पुकारण्यात आला होता. या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसले आज त्यांच्या उपोषणाचा ११ वा दिवस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com