मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक केदार शिंदे (Director Kedar Shinde) हे सध्या चर्चेत आहेत. कारण केदार शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळेच त्यांची सध्या चर्चा होत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. केदार शिंदेंनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रावरून (Kedar Shinde Instagram Post) घेतलेला निर्णय जाहीर केला आहे. केदार शिंदे यांचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरला.
केदार शिंदे यांनी घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे. याबाबतची केंदार शिंदे यांची इन्स्टा पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन ब्रेक घेण्याचे ठरवले आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. केदार शिंदे यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "या instagram वरून तुमचं प्रेम आजपर्यंत मिळालं. पण खरं सांगू? कुठेतरी थांबायला हवं.. नव्या विचारांसाठी.. bye for now' असे म्हणत त्यांनी इन्स्टाग्रामवर ब्रेक घेतला आहे.
केदार शिंदे हे इन्स्टाग्रामवर खूपच सक्रीय असतात. या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्याचसोबत ते नेहमी आपल्या नवीन प्रोजेक्टची माहिती द्यायचे. त्याचसोबत जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा द्यायचे. पण आता त्यांनी इन्स्टाग्रामवर ब्रेक घेतल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना यावरून काहीच माहिती मिळणार नाही. त्यामुळे त्यांचे चाहते हे निराश झाले आहेत.
दरम्यान, ३० जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. सहा अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. त्याचसोबत सर्वांनीच या चित्रपटाचे कौतुकही केले होते.
केदार शिंदे यांचे 2023 मध्ये 'बाईपण भारी देवा' आणि 'महाराष्ट्र शाहीर' हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यांच्या 'बाईपण भारी देवा'या चित्रपटाला खूप यश मिळालं. पण 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यांचा हा चित्रपट आजोबा शाहीर साबळे यांच्या जीवानावर आधारित होता. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहीर साबळे यांची जीवनकहाणी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.