Suhasini Deshpande Saam Digital
मनोरंजन बातम्या

Suhasini Deshpande : ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन; मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा

Marathi Actress Suhasini Deshpande : मराठी चित्रपटसृष्टीतल अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज निधन झालं. त्यांनी ७० वर्षे १०० हून अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Sandeep Gawade

१०० हून अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज निधन झालं. त्यांच्या जाण्याने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे. दमदार अभिनय कौशल्यानं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. मात्र आज त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

देवकीनंदन गोपाला, पुढचं पाऊल, वारसा लक्ष्मीचा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, आज झाले मुक्त मी, धग, माहेरचा आहेर, गड जेजुरी, आम्ही दोघे राजा राणी, बाईसाहेब, मानाचं कुंकू मानाचा हे त्यांचे गाजलेले चित्रपट. तसंच तुझं आहे तुझ्या पाशी, बेल भंडार, कथा अकलेच्या कांद्याची, सुनबाई घर तुझंच आहे, राजकारण गेलं चुलीत, चिरंजीव आईस, सासूबाईंचं असंच असतं, लग्नाची बेडी अशा नाटकांचे हजारो प्रयोग त्यांनी केले आहेत. सुहासिनी देशपांडे यांच्यावर अंत्यविधी उद्या वैकुंठ स्मशानभूमीत पार पडणार आहेत.

१९८१ मध्ये प्रदर्शित झालेला मानाचं कुंकू , १९८३ चा ‘कथा’ , १९८६ चा ‘आज झाले मुक्त मी’, २००६ आलेला ‘आईशप्पथ’, ‘चिरंजीव’, ‘अग्निपरीक्षा’, ‘धग’ सारख्या चित्रपटांमधून त्यांनी वेगळी छाप सोडली आहे. २०११ मध्ये आलेला हिंदी चित्रपट सिंघममध्येही ता झळकल्या होत्या.

सुहासिनी देशपांडे यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हिंदी चित्रपटसृष्टीत देखील सुहासिनी देशपांडे यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगभूमीसाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना २०१५ मध्ये जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर बुधवारी ( २८ ऑगस्ट) पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT