Subodh Bhave Biopic Saam Tv
मनोरंजन बातम्या

Subodh Bhave: सुबोध भावे झळकणार नव्या बायोपिकमध्ये; निम करोली बाबांची साकारणार भूमिका, पोस्टर प्रदर्शित

Subodh Bhave Biopic: मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच ‘श्री बाबा नीब करोरी महाराज’ या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

Shruti Vilas Kadam

Subodh Bhave Biopic: मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या ‘श्री बाबा नीब करोरी महाराज’ या बायोपिक चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाद्वारे तो प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांची भूमिका साकारणार आहेत.

या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात सुबोध भावे नीम करोली बाबा यांच्या रूपात दिसत आहेत. लांब केस, दाढी, कपाळावर टीका आणि अंगावर घोंगडी असा त्यांचा लूक पाहताच प्रेक्षकांनी त्याची दखल घेतली आहे. बाबांच्या प्रतिमेसारखाच हा देखावा असल्याने पोस्टरला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

नीम करोली बाबा हे देश-विदेशातील सुप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आहेत. उत्तराखंडमधील कॅंची धाम हा त्यांचा आश्रम विशेष प्रसिद्ध असून अनेक नामांकित व्यक्तींनी येथे भेट दिली आहे. विराट कोहली, अनुष्का शर्मा, मार्क झुकरबर्ग यांसारख्या नामवंत व्यक्ती देखील त्यांचे भक्त राहिले आहेत.

या बायोपिकमधून त्यांच्या जीवनप्रवासावर आणि अध्यात्मिक कार्यावर प्रकाश टाकला जाणार आहे. सुबोध भावे यांनी आतापर्यंत मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांतून विविध व्यक्तिरेखा साकारल्या असल्या तरी हिंदी सिनेसृष्टीतली ही त्यांची मोठी पायरी ठरणार आहे. त्यांच्या या नव्या प्रवासाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीकडे असलेल्या 'या' ७ महागड्या गोष्टी; किंमत ऐकून व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: नगर- मनमाड महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू

Panipuri Pani Recipe: पाणीपुरीचं आंबट-गोड पाणी बनवण्याची सीक्रेट रेसिपी; आजच करा ट्राय

Thursday Horoscope : तब्येतीची काळजी घ्या, दवाखाने मागे लागतील; 5 राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष खबरदारी

सकाळी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा 'हा' एक घटक; लिव्हरची चरबी पटकन वितळेल

SCROLL FOR NEXT