Paaltu Faaltu Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Movie: 'पालतू फालतू' मध्ये दिसणार सुबोध-रिंकूची मिश्किल झलक; 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

Paaltu Faaltu Song: ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘पालतू फालतू’ नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे.

Shruti Vilas Kadam

Paaltu Faaltu Song: सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘पालतू फालतू’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांसाठी एक भन्नाट, गंमतीशीर अनुभव घेऊन आलं आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं लग्नानंतरच्या परिस्थितीचा आरसा दाखवणारं आहे. सुबोध भावेच्या मनातील वैताग, गोंधळ आणि त्याच्या प्रतिक्रियांचा एक मिश्कील कोलाज या गाण्यातून मांडण्यात आला आहे.

‘पालतू फालतू’ हे विनोदी गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या आवाजात रंगलेलं असून या गाण्याचे बोल संजय अमर आणि साजन पटेल यांनी लिहिलं असून अमेय नरे व साजन पटेल यांचं खटकेबाज संगीत ‘पालतू फालतू’ या गाण्याला लाभलं आहे.

गाण्याविषयी दिग्दर्शक संजय अमर म्हणाले, '' 'पालतू फालतू’ हे गाणं प्रत्येक नवऱ्याच्या मनातील हक्काच्या बडबडीचं प्रतिनिधित्व करतं. सुबोध आणि रिंकूने या दृश्यांना ज्या सहजतेने जिवंत केलं, ते खरंच बघण्यासारखं आहे.हे एक गंमतीशीर गाणं आहे.''

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटाचं लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केलं आहे. रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे निर्माता रजत अग्रवाल आहेत. साजन पटेल आणि अमेय नरे यांचे संगीत, तसेच सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या दमदार भूमिका या सिनेमाला एक वेगळीच उंची देतात. गूढ, विनोद आणि प्रेमाचा अफलातून मेळ असलेल्या ‘बेटर-हाफची लव्हस्टोरीचा टिझर आधीच चर्चेत आला असून आता हे गाणं देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. येत्या २२ ऑगस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

Success Story: रोज ७-८ तास अभ्यास, रेल्वेत नोकरी करत दिली UPSC; तिसऱ्या प्रयत्नात IAS; रिया सैनी यांचा प्रेरणादायी प्रवास

Kendra Trikona Rajyog: शनीने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींचं नशीब बदलून मिळणार घवघवीत यश

Dharmendra Death: महानतेचं उदाहरण...! धर्मेंद्र यांच्या निधनाने अमिताभ बच्चन भावूक, जिगरी दोस्तासाठी लिहिली खास पोस्ट

SCROLL FOR NEXT