Hashtag Tadev Lagnam Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hashtag Tadev Lagnam: लग्नसराईचा उत्साह वाढवणारं 'हॅशटॅग तदेव लग्नम्’मधील गाणं प्रदर्शित;'सगळ्यांचा फोटो' गाणं देणार लग्नाच्या आठवणींना उजाळा

Hashtag Tadev Lagnam: हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटातील 'सगळ्यांचा फोटो' हे कमाल गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

Manasvi Choudhary

सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस सुरु असून वधूवरांसाठी लग्नाचा दिवस खूप खास असतो. हा सुंदर क्षण ते फोटोच्या स्वरूपात कायम जपून ठेवतात. वधूवरांचा हा क्षण अधिक अविस्मरणीय करण्यासाठी ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटातील 'सगळ्यांचा फोटो' हे कमाल गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानच्या लग्नाचा बार उडाला असल्याचे दिसत असून त्यांच्या लग्नाचे फोटोज काढले जात आहेत. यात लग्नातील फोटो काढण्यासाठी नातेवाईकांची, मित्रमंडळींची सुरु असलेली लगबग, घाई आणि नव्या जोडप्याचा फोटो काढण्याचा आनंद दिसत आहे. गाण्यात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची कमाल केमिस्ट्री दिसत असून 'कलरफूल' दिसणारं हे गाणं लग्नसमारंभात सर्रास वाजेल असंच आहे. येत्या २० डिसेंबरच्या शुभ मुहूर्तावर प्रेक्षकांनी या लग्नाला आवर्जून उपस्थिती दर्शवायची आहे.

‘सगळ्यांचा फोटो’ हे गाणं क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून साकारले असून पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या धमाकेदार गाण्याला नकाश अझीझ आणि आर्या आंबेकर यांचा आवाज लाभला आहे. गाण्यातून प्रेक्षकांना हसवणारी आणि त्यांच्या लग्नाच्या आठवणींमध्ये रममाण करणारी मजेदार झलक पाहायला मिळत आहे.

शुभम फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत. तर या चित्रपटात सुबोध भावे, तेजश्री प्रधान, प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, आणि शर्मिष्ठा राऊत यांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात की, " हे गाणं पाहाताना, ऐकताना अनेक जण त्यांच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा देतील आणि ज्यांचे लग्न झाले नाही त्यांच्या लग्नात असा क्षण नक्कीच येईल. या गाण्यात नातेसंबंधांतील गोडवा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला असून नव्या जोडप्याच्या लग्नानंतरच्या मजेदार क्षणांपासून ते नातेवाईकांची उत्सुकता आणि लगबग, हे सगळं प्रेक्षकांना आपलंसं वाटेल, याची खात्री आहे. ‘फोटो फोटो’ केवळ एक गाणं नसून, प्रत्येक लग्नात पाहायला मिळणाऱ्या आनंदाचे प्रतिबिंब आहे".

निर्माते शेखर विठ्ठल मते म्हणतात, '' हे गाणं म्हणजे तुमच्या आमच्या घरातील लग्नाचा व्हिडिओ आहे. खूप सुंदर असे हे गाणं आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं आहे. ज्याप्रमाणे संगीतप्रेमींना 'नकारघंटा' हे गाणं आवडलं तसंच हे गाणंही निश्चितच आवडेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT