Subhedar Release Date Changed Instagram
मनोरंजन बातम्या

Subhedar Release Date Changed: ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत पुन्हा बदल, चिन्मय मांडलेकरने केला महत्वाचा खुलासा म्हणाला...

Chetan Bodke

Subhedar Release Date Changed: राजा शिवछत्रपतींच्या चित्रपटातील अष्टकांमध्ये आतापर्यंत चार चित्रपुष्प आपल्या भेटीला आले आहेत. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराजच्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला पाचवे पुष्प भेटीला येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. हा चित्रपट येत्या १८ ऑगस्टपासून भेटीला येणार होता. पण दिग्दर्शकांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल केला आहे.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपटाबद्दल प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. चित्रपट प्रदर्शनाकरीता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असताना चित्रपटाच्या टीमने चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. याची माहिती अभिनेता चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावरद्वारे दिली आहे.

‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वात आधी तारीख २५ ऑगस्ट होती. पण त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १८ ऑगस्ट करण्यात आली होती. पण आता काही तांत्रिक अडचणींमुळे चित्रपट २५ ऑगस्टलाच प्रदर्शित केला जाणार आहे. प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याबद्दल चिन्मय मांडलेकरने एक फोटोच्या माध्यमातून सांगितले.

अभिनेता चिन्मय मांडलेकर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतो, “जय जिजाऊ! जय शिवराय! नमस्कार.. छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार नरवीर तान्हाजीराव मालुसरे यांचा पराक्रम सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर आपणां सर्वांना अनुभवता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आम्ही सगळे सुद्धा तुमच्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. कोणत्याही अडचणीला न घाबरता आम्ही चित्रपट तुमच्या भेटीला आणणारच आहोत. यासाठी लागणार काळ आणि तुमची साथ आम्ही तुमच्याकडे मागत आहोत. या तांत्रिक अडचणीवर मात करून श्री शिवराज अष्टकातले पाचवे पुष्प ‘सुभेदार’ दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित करीत आहोत. या अडचणीच्या काळात तुम्ही सर्व रसिक मायबाप आणि शिवभक्त आमच्या पाठीशी आधार बनून उभे रहाल ही खात्री आहे. हर हर महादेव.” असं म्हणत अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टला अभिनेत्याने एक कॅप्शन देखील दिला आहे. अभिनेता कॅप्शनमध्ये म्हणतो, “जिकत नाही जवर तवर झुंजत राह्याचं... आम्हीही शिवरायांचे मावळे आहोत, अडचणींवर मात करणार आणि २५ ऑगस्टला तुमच्या भेटीस नक्की येणार...!” चित्रपटात मुख्य भूमिकेत मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडेसह अनेक दिग्गज कलाकारांची फौज चित्रपटात दिसणार आहे.

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या ‘सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपटातले गाणे प्रदर्शित झाले असून गाण्यांनाही चांगलाच प्रतिसाद मिळतोय. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहात झळकणार आहे. ‘शिवराज अष्टक’मधील, ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ‘सुभेदार’ या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. (Marathi Film)

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT