आज (8 जानेवारी 2026 ) साऊथ अभिनेता 'यश' चा वाढदिवस आहे.
'टॉक्सिक' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे.
'टॉक्सिक' चित्रपट प्रदर्शनाची तारीख 19 मार्च 2026 आहे.
साऊथ अभिनेता 'यश' चा आज (8 जानेवारी 2026 ) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांना भन्नाट सरप्राइज दिले आहे. 'टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. यात यशचा खतरनाक अवतार पाहायला मिळाला आहे. गेल्या अनेक काळापासून यश 'टॉक्सिक' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.
'टॉक्सिक'च्या टीझरमध्ये यशचा थरार अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये यश शेवटी बोलतो की, "डॅडी इज होम..." व्हिडीओत खतरनाक पद्धतीने यश एन्ट्री घेतो. डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार पाहायला मिळते. त्याचा हा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे. टीझरमध्ये स्मशान भूमीची दृश्य पाहायला मिळत आहे. यशची अॅक्शन पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
'टॉक्सिक' चित्रपटात कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी , तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत या अभिनेत्री झळकल्या आहेत. प्रेक्षक या टीझरवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत.
'टॉक्सिक' चित्रपट प्रदर्शनाची तारीख 19 मार्च 2026 आहे. हा चित्रपट इंग्रजी आणि कन्नडमध्ये एकाच वेळी चित्रित केला जात आहे. तर हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये डब केला जाणार आहे. 'टॉक्सिक' चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहन दास आणि निर्माते वेंकटनारायण आणि यश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.