Subhash Ghai Spoke About Choli Ke Peeche... Song Controversy  Saam TV
मनोरंजन बातम्या

Aye Watan Tere Liye New Version : 'ए वतन तेरे लिए' संस्कृत व्हर्जन प्रदर्शित, गाणे ऐकून सुभाष घईंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी...

Subhash Ghai On Aye Watan Tere Liye:

Pooja Dange

Karma Movie Song Aye Watan Tere Liye :

निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या 'कर्मा' चित्रपटातील 'ए वतन तेरे लिए' या गाण्याच्या संस्कृत व्हर्जनचे बुधवारी संध्याकाळी मुंबईत प्रदर्शित झाले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हे गाणे लाँच करण्यात आले.

यावेळी सुभाष घई म्हणाले की, मला आनंद आहे की आज हे गाणे प्रदर्शित होत झाल्याने सर्वजण खूप उत्साहित आहेत. 'कर्मा' चित्रपटातील 'ए वतन तेरे लिए' हे गाणे संस्कृतमध्ये रिलीज होत असल्याची चर्चा आज संपूर्ण देशात आहे. मला वाटते की आपला देश ज्याप्रकारे प्रगती करत आहे, त्या दृष्टीने आपली संस्कृती आणि भाषा समजून घेणे खूप गरजेचे आहे.

कर्मा हा चित्रपट ८ ऑगस्ट १९८६ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या संस्कृत आवृत्तीतील 'ए वतन तेरे लिए' या गाण्याच्या रिलीजबाबत निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई म्हणाले, '37 वर्षांपासून 'कर्मा' लोकांच्या हृदयात रुजले आहे.

या चित्रपटाच्या यशाचे कारण म्हणजे हा चित्रपट पाहिल्यानंतर, विशेषत: 'ए वतन तेरे लिए' ऐकल्यानंतर लोकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होते. आजही लोक तितक्याच उत्साहाने चित्रपट पाहतात. मी विचार केला की मी चित्रपटाला ट्रिब्यूट कसा देऊ शकतो? माझे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल जी आणि गीतकार आनंद बक्षी साहेब यांनी केलेले काम हे गाणे अजरामर झाले आहे. (Latest Entertainment News)

निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई म्हणाले, 'जेव्हा मी कोणत्याही कार्यक्रमात जातो, तेव्हा मी लोकांना हे गाणे मोठ्या उत्साहाने गाताना ऐकले. मग या वर्षी हे गाणे पुन्हा रेकॉर्ड करू का, असा विचार केला. मी स्वतः अकरावीपर्यंत संस्कृतमध्ये शिकलो आहे.

संस्कृतला स्वतःचा मान आहे, ती तुमची संस्कृती आहे, संस्कृत ही तुमची पूजा आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त संस्कृत ऐका. मग हे गाणे संस्कृतमध्ये प्रदर्शित करावे असा विचार मनात आला. जेणेकरून आजची पिढी संस्कृत भाषेशी जोडू जाईल.'

'कर्मा' चित्रपटातील 'ए वतन तेरे लिए' हे गाणे कविता कृष्णमूर्ती यांनी संस्कृतमध्ये गायले आहे. निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई म्हणतात, 'मी कविता कृष्णमूर्ती जी यांना फोन केला आणि सांगितले की ही माझी संकल्पना आहे. या गाण्याला संस्कृतमध्ये जायचे आहे. हे गाणे प्रत्येकाच्या हृदयात कोरलेले आहे.

त्यामुळे संस्कृतमध्ये गाणे खूप सोपे होईल आणि त्यांनी गायले, खूप छान गायले. मला आनंद आहे की आज हे गाणे खूप उत्साहात रिलीज होत आहे. याबद्दल प्रत्येकजण खूप उत्सुक आहे. आज संपूर्ण देशात चर्चा आहे की, कर्माचे गाणे संस्कृतमध्ये रिलीज होत आहे.

'कर्मा' चित्रपटात जॅकी श्रॉफनेही एक खास व्यक्तिरेखा साकारली आहे. 'ए वतन तेरे लिए'च्या रिलीजवेळी जॅकी श्रॉफही उपस्थित होता. जॅकी श्रॉफ म्हणाला, 'या चित्रपटाचा मी भाग आहे हे माझे भाग्य आहे.

आज या गाण्याचे संस्कृत व्हर्जन रिलीज होत आहे याचा मला खूप सन्मान वाटतो. हे गाणे आजच्या तरुणांना संस्कृत शिकण्याची प्रेरणा देईल. मी संस्कृत शिकलो नाही हे माझे दुर्दैव होते, पण आता मी स्वतः संस्कृत शिकणार आहे. जेणेकरून मी लोकांना संस्कृत शिकण्यासाठी प्रेरित करू शकेन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident : अपघाताचा थरार, भरधाव कारने चौघांना उडवलं; संतप्त लोकांनी कोर फोडली, अमरावतीमधील घटना

Mumbai Police Transfer : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या, कारण काय?

Maharashtra Live News Update: भरधाव अनियंत्रित चारचाकी कारने चार जणांना उडवले.अमरावती शहरातील मोती नगर मधील धक्कादायक घटना

Hair Care: तुमच्या केसांसाठी कोणता शॅम्पू आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

पतीशी भांडण, पोलिसाशी अफेअर, शरीरसंबंध अन् हत्या; आरोपीचा खरा चेहरा 'असा' समोर आला

SCROLL FOR NEXT