Stree 2 Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Stree 2 Box Office Collection Day 2: 'स्त्री 2'ने दुसऱ्या दिवशीच रचला इतिहास, 'पठाण'ला मागे टाकत १०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Stree 2 Movie : 'स्त्री 2' या चित्रपटामध्ये जबरदस्त अभिनयाच्या माध्यमातून श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती आहे. चित्रपट रिलीजनंतरचा आजचा तिसरा दिवस आहे. विकेंडला रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत सर्व रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव 'स्त्री 2' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली? हे पाहूया

'स्त्री 2' या चित्रपटामध्ये जबरदस्त अभिनयाच्या माध्यमातून श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षाही जास्त कमाई केली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या स्पर्धेत अक्षय कुमारचा 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमच्या 'वेदा' चित्रपट आहे. पण बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2'चीच जादू पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहायला प्रेक्षक जास्त गर्दी करत आहेत. कमाईच्या बाबतीत देखील 'स्त्री 2'ने या दोन्ही चित्रपटांना मागे टाकले आहे.

'स्त्री 2' या चित्रपटाला विकेंडचा खूप चांगला फायदा होत आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला या दिवशी सुट्टी असल्यामुळे प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहिला. त्यामुळे चित्रपटाला दमदार कमाई करण्यात यश आले. पहिल्या दिवशीच या चित्रपटाने 76.50 कोटी रूपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू कायम होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 30 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. यासोबतच 'स्त्री 2' चित्रपटाने दोन दिवसात एकून 106.5 कोटींची कमाई केली आहे. अवघ्या दोन दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे.

'स्त्री 2' हा चित्रपट हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री'चा सिक्वेल आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना प्रंचड आवडला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वेलनेही प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यामुळे हा चित्रपट देखील पहिल्या चित्रपटाप्रमाणे कमाईत मोठा विक्रम करताना दिसत आहे. 'स्त्री 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शाहरूख खानच्या पठाण चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीच या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारा चौथा चित्रपट ठरला आहे.

१०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केलेले चित्रपट -

पठाण - २ दिवसांत 123 कोटींची कमाई

अ‍ॅनिमल- २ दिवसांत 113.12 कोटींची कमाई

जवान- २ दिवसांत 111.73 कोटींची कमाई

स्त्री 2- २ दिवसांत 106.5 कोटींची कमाई

टाइगर 3- २ दिवसांत 103.75 कोटींची कमाई

KGF: चॅप्टर 2 - २ दिवसांत 100.74 कोटींची कमाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT