Stree 2 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Stree 2 Box Office Collection : ‘स्त्री-२’ ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! जगभरात 400 कोटींपार कमाई, गदर 2ला टाकलं मागं

Stree 2 Box Office Day 8 : स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. काही दिवसातच त्यांनी बॉक्स ऑफिसवर मोठ कलेक्शन केलं आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या स्त्री 2 ने कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर भन्नाट कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच पसंतीस पडला आहे. चित्रपटाची स्टारकास्ट श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांना चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळत आहे.

स्त्री 2 (Stree 2) चित्रपटाची जादू सर्वत्र पाहायला मिळत आहे. यावेळी चित्रपटात श्रद्धा कपूर चंदेरी गावावर आलेल्या संकटाचा अंत करण्यासाठी डायन बनून लढताना दिसत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट भलताच पसंतीस पडला आहे. बॉक्स ऑफिसवर स्त्री 2 अनेक मोठ्या चित्रपटांना जबरदस्त स्पर्धा देत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, स्त्री 2 ने रिलीजच्या 8 व्या दिवशी सुमारे 16 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

स्त्री 2च्या कलेक्शनवर एक नजर

  • पेड प्रीव्यू 8 कोटी रुपये

  • १ दिवशी 51.8 कोटी रुपये

  • २ दिवशी ३१.४ कोटी रुपये

  • ३ दिवशी 43.85 कोटी रुपये

  • ४ दिवशी ५५.९ कोटी रुपये

  • ५ दिवशी 38.1 कोटी रुपये

  • ६ दिवशी २५.८ कोटी रुपये

  • ७ दिवशी 20 कोटी रुपये

  • ८ दिवस 16 कोटी रुपये

आतापर्यंत एकूण कलेक्शन 290.85 कोटी रुपये

आतापर्यंतचे 'स्त्री 2' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) पाहिल्यास चित्रपटाने भारतात 290.85 कोटीची कमाई केली आहे. 60 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत जगभरात आपला ठसा उमटवला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, 'स्त्री 2' ने जगभरात 400 कोटींचा आकडा पार केला आहे.

स्त्री 2 ने गदर 2 ला मात दिली

15 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या हॉरर-कॉमेडी स्त्री 2 ने पहिल्या आठवड्यात 8 दिवस बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. कमी बजेटमध्ये चित्रपट बनवल्यामुळे भारतातील मोठ्या ब्लॉकबस्टरच्या यादीत स्त्री 2 चा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या गुरुवारी 16 कोटी रुपयांच्या कमाई स्त्री 2 ने केली.

कमाईच्या बाबतीत स्त्री 2 ने मोठा आकडा गाठल्यामुळे तो जास्त कमाई केलेला आता पर्यंतचा चौथा हिंदी चित्रपट ठरला आहे. या यादीत शाहरुख खानच्या पठाण आणि जवान या चित्रपटांची नावे प्रथम आहेत. तिसऱ्या क्रमांकावर रणबीर कपूरचा ॲनिमल चित्रपट आहे. त्यानंतर सनी देओलच्या गदर 2 चे नाव चौथ्या क्रमांकावर होते. पण आता मात्र त्याची जागा स्त्री 2 या चित्रपटाने घेतली आहे. या वीकेंडला श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री 2 500 कोटींची कमाई करेल अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Vice President Election : कुणाचा गेम होणार? मतदानाआधीच ३ पक्षाची माघार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT