Stree 2  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Stree 2 box Office Collection Day 3: स्त्री 2 चा बॉक्स ऑफिसवर कल्ला, तिसऱ्या दिवशीही केली 'इतक्या' कोटींची कमाई

Shraddha Kapoor And Rajkumar Rao Starrer Stree 2 Movie: १५ ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. चित्रपट प्रदर्शित होताच तीन दिवसांत सुपरहिट चित्रपटाच्या यादीत पोहचला आहे.

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा स्त्री 2 या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. १५ ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. चित्रपट प्रदर्शित होताच तीन दिवसांत सुपरहिट चित्रपटाच्या यादीत पोहचला आहे. पहिल्याच दोन दिवसात १०० कोटींचा टप्पा ओलांडत स्त्री 2 ने आता नवा विक्रम केला आहे.

१५ ऑगस्ट सुट्टीच्या दिवशी रिलीज झालेल्या स्त्री 2 चित्रपटाने पहिल्याच दिवशी 60.3 कोटींहून अधिक कलेक्शन करत धमाकेदार ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 31.4 कोटी रूपयांची कमाई केली. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवला आहे ते जाणून घेऊया.

स्त्री 2 चित्रपटाच्या कलेक्शन पाहता, चित्रपट पहिल्याच दिवसांपासून तगडी कमाई करत आहे. चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वी पेड प्रिव्ह्युमधून 8.50 कोटी रूपयांची तगडी ओपनिंग केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 31.4 कोटींची कमाई केली.आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाने अपेक्षित यश मिळवून दिले आहे. चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची कमाई 44 कोटी रूपयांचा गल्ला जमावला आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 135. 7 कोटींची कमाई केली आहे.

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्त्री 2 हा चित्रपट तिसरा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. हॉरर कॉमेडी चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत.'स्त्री 2' हा चित्रपट हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री'चा सिक्वेल आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना प्रंचड आवडला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वेलनेही प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यामुळे हा चित्रपट देखील पहिल्या चित्रपटाप्रमाणे कमाईत मोठा विक्रम करताना दिसत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Gold Rate Today : सोन्याची किंमत पुन्हा घसरली, आठवडाभरात इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

आजीसोबत झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण; बलात्कार करून रक्ताच्या थारोळ्यात सोडलं, भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल

Shocking News : कर्ज न फेडल्यामुळे एजंटने मर्यादा ओलांडल्या, कर्जदाराच्या पत्नीचे 'तसले' फोटो केले व्हायरल

Indurikar Maharaj Net Worth: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांची संपत्ती किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT