Stree 2 Box Office Collection CANVA
मनोरंजन बातम्या

Stree 2 Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफिसवर स्त्री-२ चा जलवा; राजकुमार राव, श्रद्धा कपूर प्रेक्षकांना घाबरण्यात यशस्वी , जाणून घ्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन

Box Office Collection Stree 2 : दुसऱ्याच दिवशी श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2 ' बॉक्स ऑफिसवर अर्धशतक पुर्ण झालं आहे. 'स्त्री 2 ' चित्रपटाचं प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'स्त्री 2 ' चित्रपटाची उत्सुक्ता अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये होती. काल दिनांक १५ रोजी 'स्त्री 2 ' चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यात आला. 'स्त्री 2 ' चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर , राजकुमार राव , पकंज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले आहेत. 'स्त्री 2 ' ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पहिल्याच दिवसाच्या कमाईच्या बाबतीत 'स्त्री 2 ' चित्रपटाने सलमान खानच्या 'टायगर 3 ' आणि ' भारत ' या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

अनेक प्रेक्षकांच्या मते 'स्त्री 2 'यंदाच्या वर्षातली बेस्ट हॉरर कॉमेडी चित्रपट ठरू शकतो. प्रत्येक आठवड्याला अनेक चित्रपट बॉक्स ऑफिस वर येतात, परंतु काही चित्पपटांचं वेड त्यांच्या ट्रेलरमुळेच लागतं. बॉक्स ऑफिस वर येताच 'स्त्री 2 ' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा केली. स्री चित्रपटामध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. 'स्त्री'च्या यशानंतर स्री २ सुद्धा प्रेक्षकांना पाहायला आवडतोय. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यावर अगदी २ दिवसात 'स्त्री 2' हाफ सेंच्युरी पुर्ण केलीये. त्यासोबतच बॉलिवूडमध्ये नवा इतिहास देखील रचलाय.

'स्त्री 2' या चित्रपटाला अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम सारख्या दिग्गज कलाकाराची टक्कर होती. 'स्त्री २' ने ८.३५ कोटी रुपयांचं कलेक्शन करून अक्षय कुमारच्या 'खेल खेल मै' आणि जॉनच्या 'वेदा' या चित्रपटांवर आपला दबाव कायम ठेवलाय

'स्त्री २ 'ने किती कमावले ?

माहितीनुसार, 'स्त्री 2' चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई तब्बल ४६ कोटी असल्यचे समोर आले होते मात्र त्यावनंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने फास्ट ट्रॅक पकडून आर्धशतक पुर्ण केलं आहे. 'स्त्री २' ने हिंदी भाषेत पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सर्वोच्च १० चित्रपटांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. 'स्त्री 2' आठवड्याबहरात १०० कोटींचा पल्ला पार करु अशी मान्यता आहे. अहवालानुसार 'स्त्री २' बनवण्यासाठी तब्बल ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. चित्रपठाच्या मुख्य अभिनेत्री श्रद्धा कपूरला शुल्क म्हणून ५ कोटी रुपये आणि राजकुमार रावला ६ कोटी रुपये दिले गेले आहेत.

Edited By: Nirmiti Rasal

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Bitter Melon Juice: दररोज सुदृढ राहायचं आहे? मग रिकाम्या पोटी प्या 'हे' ज्यूस होतील अनेक फायदे

Daily Surya Namaskar effects: दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात होतात 'हे' बदल

SCROLL FOR NEXT