State Award-Winning Actor Akhil Vishwanath Death Saam
मनोरंजन बातम्या

राज्य सरकारचा पुरस्कार मिळवलेल्या अभिनेत्याचा मृत्यू, घरातच मृतदेह आढळल्याने खळबळ

State Award-Winning Actor Akhil Vishwanath Death: तरुण अभिनेता आणि राज्य पुरस्कार विजेता अखिल विश्वनाथने घरातच आयुष्याचा दोर कापला. सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त.

Bhagyashree Kamble

सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तरूण अभिनेता आणि राज्य पुरस्कार विजेता अखिल विश्वनाथ (वय वर्ष ३०) याने आत्महत्या केली. त्याच्या राहत्या घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. अखिलची आई कामावर जाण्यासाठी तयारी करत होती. घरातून निघण्यापूर्वी तिला अखिलचा लटकेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेनंतर सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

सनल कुमार शशिधरन दिग्दर्शित चोला या चित्रपटात त्यानं मुख्य भूमिका साकरली होती. या चित्रपटात त्यानं एका प्रेमीची भूमिका साकरली होती. त्यानं ऑपरेशन जावा या चित्रपटातही काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अखिल कोट्टाली येथील एका मोबाईल फोनच्या दुकानात काम करत होता. काही दिवसांपासून तो कामावर जात नव्हता. काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचा अपघात घडला होता. सध्या त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मनोरमा ऑनलाइनच्या वृत्तानुसार, अखिल त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याने नेमकी आत्महत्या का केली? याची माहिती समोर आली नाही. अखिलच्या मृत्यूची माहिती सर्वात आधी मनोज कुमार यांनी दिली. 'अखिल, हे तू काय केलेस?', असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली. दिग्दर्शक सनल कुमार शशिधरन यांनी शोकसंदेशात लिहिले की, 'अखिलने आत्महत्या केली. ही बातमी ह्रदयद्रावक आहे'.

बाल कलाकार ते चोलापर्यंतचा प्रवास

अखिलने लहानपणीच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्याला 'मांगंडी' या चित्रपटासाठी बाल कलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. नंतर सनल कुमार शशिधरन दिग्दर्शित चोला या चित्रपटाने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. २०१९ साली त्याला राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT