Tuzya Sobatine Marathi Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tuzya Sobatine: 'स्टार प्रवाह'च्या नव्या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख बदलली! या दिवशी प्रसारित होणार पहिला एपिसोड

Tuzya Sobatine Marathi Serial: स्टार प्रवाह वाहिनीवर येणारी नवीन मराठी मालिका ‘तुझ्या सोबतीने’ची तारिख बदलण्यात आली आहे. स्टार प्रवाहने या मालिकेची नविन तारिख जाहिर केली आहे.

Shruti Vilas Kadam

Tuzya Sobatine Marathi Serial: स्टार प्रवाह वाहिनीवर येणारी नवीन मराठी मालिका ‘तुझ्या सोबतीने’ याच महिन्याच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची घोषणा आधीच झाली होती. मात्र आता तिच्या लाँच डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. पहिल्या घोषणेनुसार ही मालिका 12 जानेवारी २०२६ पासून रात्री 9 वाजता सुरू होणार होती, परंतु आता तिचा प्रसारण दिवस पुढे ढकलून 19 जानेवारी २०२६ करण्यात आला आहे, अशी माहिती स्टार प्रवाहने अधिकृतपणे जाहीर केली आहे.

नवीन वेळ

नवीन अपडेटनुसार ‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका 19 जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाणार आहे. या बदलामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या मालिकेच्या वेळ बदलीमुळे हे सुद्धा प्रश्न उपस्थित झाले आहेत की, सध्या रात्री ९ वाजताच्या प्राइम टाइम स्लॉटमध्ये चालणारी ‘नशीबवान’ मालिका आता कोणत्या वेळेवर दिसेल किंवा ती मालिका सुरूच राहणार की बंद होईल याबद्दल अधिकृत माहिती प्रेक्षकांना लवकरच मिळेल.

प्रमुख पात्रे

‘तुझ्या सोबतीने’ मालिकेत प्रमुख अभिनेत्री एतशा संझगिरी आणि अभिनेता अजिंक्य ननावरे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मालिकेत एतशाचे ऑन-स्क्रीन सासूबाईचे पात्र साकारणारी पूजा नायक सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यापूर्वी एतशा आणि पूजा दोघींनी ‘छोटी मालकीण’ मालिकेतही सासू-सुनेची भूमिका जोमाने साकारली होती.

कथा आणि अपेक्षा

तुझ्या सोबतीने’ ही मालिका प्रेम, नातेसंबंध आणि जीवनातील विविध भावनिक टप्प्यांवर आधारित आहे. नवीन कथा, नवीन कलाकार आणि मनोरंजक ट्विस्ट यामुळे ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या आवडची ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT