Muramba Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’ प्रेक्षकांना सतत नवीन ट्विस्ट आणि टर्न्स देत असते. अलीकडेच मालिकेत सात वर्षांचा मोठा लीप दाखवण्यात आला असून, या लीपनंतर पहिल्यांदाच रमा आणि अक्षय आमनेसामने आले आहेत. नवीन प्रोमोने मालिकेची कथा पुन्हा एकदा रंगली असून, चाहत्यांमध्ये या दोघांच्या भेटीमुळे मोठा उत्साह आहे.
प्रोमोमध्ये दाखवले आहे की, सात वर्षांनंतर रमा आपल्या आयुष्यात पुढे गेली असली तरी तिच्या मनात अक्षयची आठवण दडलेली आहे. दुसरीकडे, अक्षयही आपल्या विश्वात रमला असला तरी रमा आणि त्यांच्या नात्याच्या आठवणी त्याला सोडत नाहीत. या काळात त्यांची लेक आरोही मोठी झालेली आहे आणि ती एका महत्त्वाच्या स्पर्धेसाठी तयारी करत आहे.
स्पर्धेच्या दिवशी आरोही वडिलांची म्हणजे अक्षयची आतुरतेने वाट पाहत असते. मात्र, अक्षय ट्रॅफिकमध्ये अडकतो आणि वेळेत पोहोचू शकत नाही. याचवेळी रमा आरोहीच्या मदतीला धावते. ती आरोहीला प्रोत्साहन देत स्पर्धेत सहभागी करते. दरम्यान, स्पर्धा सुरू होताच अक्षय मैदानात पोहोचतो. दूरूनच तो पाहतो की आरोही कोणाबरोबर धावत आहे. तो नजरेने पाठलाग करताच त्याची नजर रमा वर स्थिरावते.
सात वर्षांनंतर घडलेली ही नजरानजर एक क्षणभर वेळ थांबवते. दोघांच्या डोळ्यांत जुन्या आठवणी, न बोललेले शब्द आणि तुटलेल्या नात्याची वेदना दाटून येते. मात्र, ही भेट फक्त काही क्षणांची असते कारण स्पर्धेचा गजर सुरुच असतो. या प्रोमोने मालिकेत पुढे काय घडेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रमा–अक्षयचा दुरावा मिटणार का? आरोहीमुळे हे कपल पुन्हा एकत्र येणार का? की त्यांच्या आयुष्यात नवा वळण येणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.