Shreya Maskar
फराळी चिवडा बनवण्यासाठी बटाटा सोलून बारीक किसून घ्या.
किसलेला बटाटा गरम पाण्यात भिजवून त्यातील पाणी काढून कॉटनच्या कपड्यावर वाळवा.
बटाट्याचा कीस कोरडा झाल्यावर तेलात खरपूस तळून घ्या.
एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात कढीपत्ता, शेंगदाणे, साबुदाणा, काजूचे तुकडे, हिरव्या मिरची तळून घ्या.
आता एका खोलगट बाऊलमध्ये बटाट्याचा तळलेला किस , शेंगदाणे आणि इतर तळलेले पदार्थ घालून मिश्रण करा.
तयार चिवडा हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवून द्या.
तुम्ही यात तुमच्या आवडीचे मसाले आणि इतर पदार्थ देखील टाकू शकता.
फराळी चिवडा बनवताना बटाटा थोडा कच्चा घ्या.