KGF Star Yash Saam Tv
मनोरंजन बातम्या

KGF स्टार यशचा साधेपणा पुन्हा आला समोर, पत्नीसाठी साध्या दुकानातून खरेदी केलं चॉकटेल; फोटो पाहून चाहते थक्क

Yash Buy Chocolate For Wife From Store: रॉकी भाईने आपल्या पत्नी राधिका पंडितसाठी (Radhika Pandit) जनरल स्टोअर्समध्ये जाऊन चॉकलेट विकत घेतलं. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Yash Photo Viral:

कन्नड सुपरस्टार यशला (Yash) सध्या कोणत्याही परिचयाची गरज नाही. 'KGF' चित्रपटाच्या माध्यमातून यशने सर्वांची मनं जिंकली. त्यानंतर त्याचा चाहतावर्ग देखील वाढला. रॉकी भाई आपल्या साधेपणाने नेहमी चाहत्यांची मनं जिंकत असतो. त्यांच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. यशचा साधेपणा नेहमीच समोर आला आहे. आता त्याचा आणखी एक साधेपणा समोर आला आहे. रॉकी भाईने आपल्या पत्नी राधिका पंडितसाठी (Radhika Pandit) जनरल स्टोअर्समध्ये जाऊन चॉकलेट विकत घेतलं. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा साधेपणा पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

साऊथ स्टार यश हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अभिनेत्याचे लाखो चाहते आहेत जे त्याच्यावर खूप प्रेम करतात. यश नेहमीच आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयावर राज्य करतो. पण यावेळी त्याच्या साधेपणाने पुन्हा एकदा चाहत्यांना त्याचे चाहते बनवले आहे. यशचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पत्नी राधिकासाठी चॉकलेट खरेदी करताना दिसत आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चर्चेत आला आहे.

यश नुकताच चित्रपूर मठात गेला होता. यावेळी त्याच्यासोबत पत्नी राधिका पंडितही होती. यावेळी, अभिनेत्याने आपल्या लाडक्या पत्नीसाठी एका छोट्याशा किराणा दुकानातून चॉकलेट खरेदी केले. यावेळी त्याची पत्नी त्याच्या शेजारी बसली होती. यशच्या एका चाहत्याने त्याला आणि त्याच्या पत्नीला मोबाईलमध्ये कैद केले आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये दिसत आहे की यश दुकानातून काही तरी खरेदी करत आहे. तर त्याची पत्नी स्टूलवर बसलेली दिसत आहे.

यश आणि राधिका नेहमीच आपल्या चाहत्यांना त्याच्या साधेपणाची झलक दाखवत असतो. सोशल मीडियावर सक्रीय असणारा यश नेहमीच आपल्या पर्सनल लाइफ आणि प्रोजेक्टविषयची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यश आणि राधिका यांची जोडी देखील त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. यश आणि राधिकाने 2016 मध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. यश लवकरच गीतू मोहनदासच्या 'टॉक्सिक' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT