Suriya Debut In Bollywood Instagram @actorsuriya
मनोरंजन बातम्या

HBD Suriya : अलिशान गाड्या अन् करोडोंची संपत्ती साऊथचा 'हा' बडा अभिनेता बॉलिवूड स्टार्सलाही टाकतोय मागे

Suriya Sivakumar: सूर्याने १९९७साली नेरुक्कू या चित्रपटातून त्याच्या करियरची सुरुवात केली होती.

Pooja Dange

Networth Of South Superstar Suriya : साऊथ सुपरस्टार सूर्याचा आज म्हणजे २३ जुलै वाढदिवस आहे. साऊथचा सिंघम आज ४८ वर्षांचा झाला. साऊथ चित्रपटसृष्टीत सूर्याने त्याच्या अभिनयाने दबदबा निर्माण केला आहे. तसेच प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे अढळ स्थान देखील निर्माण केले आहे.

सूर्याने साऊथ चित्रपटसृष्टीत काम करून स्वतःची एका ओळख निर्माण केली आहे. आज त्याच्या त्याच्याकडे किती संपत्ती आहे. कार्तिक आर्यन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची संपत्ती एकत्र केली तरी सूर्याला ते मागे टाकू शकत नाहीत.

सूर्याकडे ऑडी क्यू ७, ऑडी ए ७, फॉर्च्युनर, जॅगुआर एक्क्सएफ आणि मर्सिडीज बेन्जसारख्या महागड्या गाड्या आहेत. त्याला आलिशान गाड्यांचा शौक आहे. (Latest Entertainment News)

फोर्ब्स मॅगझीनच्या वृत्तानुसार सूर्याकडे जवळजवळ १८६ करोडची संपत्तीची आहे. इतकेच नाही तर तो दार महिन्या १.५ करोड रुपये कमावतो. सूर्य एका चित्रपटासाठी २५-३० करोड रुपये चार्जे करतो.

ब्रँड प्रमोशनसाठी बनविण्यात येणार टीव्हीवरील जाहिरातींसाठी सूर्य २ करोड रुपये घेतो.

सूर्याने १९९७साली नेरुक्कू या चित्रपटातून त्याच्या करियरची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत सूर्याने ५२ चित्रपट केले आहेत.

2020 मध्ये, सुर्याचा सुपरहिट चित्रपट सुरराई पोटरूसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुर्याची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाली. सूर्या त्याची पत्नी ज्योतिका आणि मुलांसोबत चेन्नईतील एका आलिशान घरात राहतो.

कार्तिक आर्यनबद्दल बोलायचे झाले तर तो फक्त त्याच्या चित्रपटातूनच कमाई करतो. कार्तिक त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त ओप्पो, मुफ्ती, डेअरी मिल्क, मन्यावर आणि बाटा सारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती करून पैसे कमवतो. एका अहवालानुसार. कार्तिक आर्यन जवळपास ४० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.

तर सिद्धार्थ मल्होत्राची एकूण संपत्ती 80 कोटी आहे. सिद्धार्थ मल्होत्राने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 15 चित्रपट केले आहेत. त्याची मासिक कमाई 50 लाखांपेक्षा जास्त आहे आणि एका वर्षात 6 कोटी कमावते. याशिवाय सिद्धार्थने पॅरिस, न्यूयॉर्क, मिलान आणि जगभरातील इतर अनेक फॅशन शोजमध्ये रॅम्प वॉकही केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT