Naga Chaitanya and Sobhita Dhulipala SAAM TV
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala : नागा चैतन्य अन् शोभिताची लगीनघाई, हळद कुटताना दिसली नववधू

Shobhita Dhulipala Naga Chaitanya Pre-Wedding Ceremony : साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.

Shreya Maskar

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Shobhita Dhulipala) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नविधींना ( Pre Wedding Ceremony ) सुरुवात झाली आहे. नागा चैतन्यचं हे दुसरे लग्न आहे.

शोभिता धुलिपालाने आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवरवरून लग्नाआधीच्या विधींचे फोटो शेअर केले आहेत. शोभिताने 'गोधूमा राय पसुपू'या विधीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती या फोटोंमध्ये दाक्षिणात्य पद्धतीने विधी करताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये शोभिता सिल्कची गुलाबी साडी नेसलेली पाहायला मिळत आहे. तसेच सोन्याचे दागिन्यांमुळे शोभिताचा लूक खुलून आला आहे. तिने केसात गजरा माळला आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहून शकता की, सगळीकडे फुलाची सजावट पाहायला मिळत आहे. शोभिता उखळात हळद कुटताना आणि जात्यावर दळण दळताना दिसत आहे. शोभिताने या फोटोंना खूप सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, 'अखेर सुरुवात झाली...गोधुमा राय पसुपू विधी' तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. तसेच अनेक कलाकारांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या फोटोंमध्ये शोभिता कुटुंबासोबत मज्जा मस्ती करताना खूप आनंदी दिसत आहे.

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी ऑगस्ट 2024 मध्ये गुपचूप साखरपुडा केला. त्यांनी सोशल मीडियावर अचानक फोटो टाकून सर्वांना धक्का दिला. साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची चाहते वाट पाहत आहेत. हे कपल सर्वांचे आवडते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG-PNC Price Cut: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घसरण, नवे दर काय?

Maharashtra Live News Update: बिबट्याचा मानवी वस्तीजवळ वावर वाढला

Hingoli Crime : मानेवर, पोटात चाकूने वार केले, हिंगोलीत भर रस्त्यात हल्ल्याचा थरार; तरुण गंभीर जखमी

Income Tax Slab: टॅक्स भरणाऱ्यांना दिलासा नाहीच; अर्थसंकल्पात नेमकी काय घोषणा झाली?

दोन्ही राष्ट्रवादी कधीच एकत्र येणार नाहीत, भाजप नेते पीयूष गोयलांचा मोठा दावा, शरद पवारांवरही वक्तव्य

SCROLL FOR NEXT