संगमनेर हे ऐतिहासिक गाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि 'हॉस्पिटल हब' म्हणून ओळखळे जाते.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काही काळ राजमाता जिजाऊ या 'पेमगिरी' गडावर राहिल्या होत्या.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'वटवृक्ष' ऐतिहासिक किल्ल्याचे ठिकाण म्हणजे‘पेमगिरी’हे नैसर्गिक सौदर्यं तुम्हाला संगमनेरमध्ये पाहता येणार आहे.
सरदार त्रिंबकजी डेंगळे हे पेशवे प्रशासनातील एक प्रमुख व्यक्ती होते. त्यांचे घर म्हणजे 'सरदार त्रिंबकजी डेंगळे वाडा' होय.
संगमनेर ठिकाणी डोंगरात वेढलेल्या तामकडा धबधबा देखील प्रवाशांना खुणावत असते. तेथे थंडगार वातावरण तुम्हाला अनुभवता येते.
संगमनेर तालुक्यात दक्षिण दिशेला असणारा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेवर नैसर्गिक सौदर्याची खाणच आहे.
संगमनेरमध्ये असलेला छत्रपती शहाजीराजे धबधबा तुम्ही पाहू शकता.