Raja Saab Movie First Look Poster Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prabhas: 'राजा साब'चे फर्स्ट लूक पोस्टर आऊट, लुंगीमध्ये स्टायलिश अवतारामध्ये दिसला प्रभास

Raja Saab Movie First Look Poster Out: पोंगल आणि मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर निर्मात्यांनी प्रभासचा आगामी 'राजा साब' या चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज केला आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये सुपरस्टार हटके स्टाईलमध्ये दिसत आहे.

Priya More

Raja Saab Movie:

साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) नव्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच 'सालार पार्ट वन सीझफायर' (Salaar Movie) या चित्रपटानंतर साऊथचा सुपरस्टार प्रभास त्याच्या आगामी 'राजा साब' चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज निर्मात्यांनी या चित्रपटातील प्रभासची पहिली झलक शेअर केली आहे. पोस्टरमध्ये प्रभास दाक्षिणात्य अवतारात दिसत आहे. 'राजा साब'च्या पोस्टरमध्ये (Raja Saab Movie) प्रभासचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. हे पोस्टर सध्या व्हायरल होत आहे.

पोंगल आणि मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर निर्मात्यांनी प्रभासचा आगामी 'राजा साब' या चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज केला आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये सुपरस्टार हटके स्टाईलमध्ये दिसत आहे. राजा साबच्या पोस्टरवर फक्त प्रभासचा चित्रपटातील लूकच दिसून येत नाही तर प्रभासचे नाव देखील बदलण्यात आले आहे.

राजा साबच्या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभासचे नाव 'Prabhas' ऐवजी 'Prabhass' असे लिहिले आहे. त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एका बाजूला 'S' दिसतो. अभिनेत्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये आणखी एक एस दिसत आहे. अभिनेत्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल का करण्यात आला आहे? की हे चुकून झाला आहे? की प्रभास अंकशास्त्राकडे वळला आहे का? यामागचे कारण समजू शकले नाही.

दरम्यान, प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, प्रभास 'सालार पार्ट एक सीझफायर' या चित्रपटामध्ये शेवटचा दिसला होता. त्याच्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 700 कोटींची कमाई केली आहे.

सालारनंतर प्रभास आता दिग्दर्शक मारुतीसोबत त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या पुढच्या चित्रपटाचे नाव आहे 'द राजा साब'. याशिवाय नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' या सायन्स फिक्शन चित्रपटात देखील प्रभास दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभाससोबत दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT