Salaar Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salaar Trailer: तयार राहा! उद्या प्रभास चाहत्यांना देतोय जबरदस्त गिफ्ट, 'सालार'चा ट्रेलर होणार रिलीज

South Superstar Prabhas: जुलैमध्ये या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. ते पाहून चाहत्यांच्या मनात या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली होती. सर्वजण या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत.

Priya More

Salaar Movie:

साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) त्याचा बहुप्रतीक्षित 'सालार पार्ट 1: सीझफायर' (Salaar Movei) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रक्षेकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२३ मधील हा त्याचा सर्वात मोठा चित्रपट असून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण हा चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

जुलैमध्ये या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. ते पाहून चाहत्यांच्या मनात या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली होती. सर्वजण या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. अशामध्ये आता निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज डेटची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १ डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. १ डिसेंबर म्हणजे उद्या प्रभास आपल्या चाहत्यांना ट्रेलरच्या माध्यमातून खास गिफ्ट देणार आहे.

प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सालार पार्ट 1: सीझफायर'चा ट्रेलर रिलीज होण्यास फक्त एक दिवस शिल्लक राहिला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 1 डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी प्रदर्शित होणार आहे. प्रभासने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून ट्रेलर रिलीजची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. सध्या चाहत्यांना 'सालार पार्ट 1' च्या ट्रेलरची प्रचंड उत्सुकता लागली आहे. हा ट्रेलर पाहण्यासाठी प्रभासच्या चाहत्यांना आणखी एका दिवसाची वाट पाहावी लागणार आहे.

'सालार पार्ट 1' ने रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकले. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे ओटीटी राइट्स 160 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील आणि प्रभास यांनी 'सालार पार्ट 1' मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले आहे. हॉम्बल फिल्म्स निर्मित या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. फक्त हिंदीच नाही तर तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT