Nagarjun Sister Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nagarjun Sister Death: साऊथ सुपरस्टार नागार्जुनवर कोसळला दुःखाचा डोंगर, या जवळच्या व्यक्तीचं निधन

Naga Saroja Death: दिवंगत दिग्गज अभिनेता अक्किनेनी नागेश्वर राव यांची मुलगी आणि नागार्जुनची बहीण नागा सरोजा यांचं निधन झालं आहे.

Priya More

Nagarjun Sister Naga Saroja Death:

साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुनच्या (south superstar nagarjun) कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिवंगत दिग्गज अभिनेता अक्किनेनी नागेश्वर राव यांची मुलगी आणि नागार्जुनची बहीण नागा सरोजा (Naga Saroja) यांचं निधन झालं आहे.

नागा सरोजा यांच्या निधनामुळे नागार्जुनच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. नागा सरोजा या गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नागार्जुनच्या बहिणीला श्वास घेण्यास त्रास होत होता. मंगळवार १७ ऑक्टोबर रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे अक्किनेनी नागार्जुन यांच्या घरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. बहिणीच्या मृत्यूनंतर नागार्जुनचे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. नागा सरोजा ही अभिनेता नागार्जुनची तिसरी मोठी बहीण होती. अक्किनेनी नागेश्वर राव यांना पाच मुले होती आणि नागा सरोजा ही तिसरी मुलगी होती. अक्किनेनी नागेश्वर राव यांना सत्यवती, नागा सुशीला, नागा सरोजा, वेंकट आणि नागार्जुन अशी पाच मुलं होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंगळवारी सकाळी नागा सरोजा यांचा मृत्यू झाला असला तरी ही घटना उशिरा उघडकीस आली. नागा सरोजा यांच्या मृत्यूने अक्किनेनी कुटुंबीय दु:खी झाले आहेत. सरोजा यांच्या निधनाती माहिती कळताच साऊथमधील सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्ती नागार्जुनला भेटायला येत आहेत. बुधवारी नागा सरोजा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, तेलुगू चित्रपटसृष्टीत अक्किनेनी कुटुंबाचे वेगळे स्थान आहे. नागेश्वर राव यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा धाकटा मुलगा नागार्जुन याने पुढे चालू ठेवला आहे. नातू सुमंत, नागा चैतन्य, अखिल आणि सुशांत हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यंकट आणि नागा सुशील चित्रपटांची निर्मिती करत आहेत. तर सुप्रिया सध्या अन्नपूर्णा स्टुडिओची देखरेख करत आहेत. कुटुंबातील बहुतांश सदस्य चित्रपटसृष्टीत असले तरी नागा सरोजा सुरुवातीपासूनच इंडस्ट्रीपासून दूर राहिल्या. त्या फक्त कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावायच्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT