Mammootty Sister Ameena Dies Instagram
मनोरंजन बातम्या

Mammootty Sister Ameena Dies: प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टारवर कोसळला दु:खाचा डोंगर, बहीण अमिनाचे निधन

Mammootty Sister Dies: दिग्गज अभिनेते मम्मुट्टी यांची धाकटी बहीण अमीना यांचे निधन झाले.

Chetan Bodke

Mammootty Sister Ameena Dies

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेते मम्मुट्टी यांची धाकटी बहीण अमीना यांचे निधन झाले. अमीना यांना नसीमा या नावाने देखील ओळखले जायचे. त्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. केरळ येथील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान मम्मुत्ती यांच्या बहिणीची प्राणज्योत मालवली.

मम्मुट्टी यांची धाकटी बहीण अमीना या कंजिरापल्ली परायक्कल यांच्या परिवारातील दिवंगत पी.एम. सलीम यांच्या पत्नी होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, मम्मुट्टी यांच्या बहीणीवर १३ सप्टेंबरला अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अमीना यांच्या निधनामुळे मम्मुट्टीसह त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींसह आणि मम्मुट्टीच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अमीना यांना श्रद्धांजली वाहिली. मम्मुट्टी यांचे वडील एक यशस्वी उद्योजक होते. मम्मुट्टी आणि त्यांच्या भावंडांचे बालपण केरळमधील चेंपू याठिकाणी गेले.

२०२३ हे वर्ष मम्मुट्टी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खूप आव्हानात्मक राहिले आहे. मम्मुट्टी यांची आई फातिमा इस्माईल यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. सुपरस्टारच्या आईचे निधन २१ एप्रिल रोजी झाले होते. वृद्धापकाळामुळे आलेल्या आजारपणामुळे त्यांच्या आईवर केरळ येखील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mughal harem: मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस दासींना कोणती कामं करावी लागत?

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

OLA-Uber: सरकारचा मोठा निर्णय! ओला, उबर कंपन्याना आता ८ वर्षांपर्यंतच टॅक्सी चालवता येणार

Kolhapur News: वडिलांच्या मोबाइलवर मुलगा खेळायचा फ्री फायर गेम, बँक खात्यातून ५ लाख गायब | VIDEO

SCROLL FOR NEXT