साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Junior NTR) त्याच्या आगामी 'देवरा' चित्रपटामुळे (Devara Part 1) गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत त्याचे चाहते खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआरची जबरदस्त अॅक्शन आणि खतरनाक लूक पाहायला मिळणार आहे. कोराटला शिवासोबतचा ज्युनियर एनटीआरचा हा चित्रपट 2024 मधील सर्वात रोमांचक चित्रपटांपैकी एक आहे. अशामध्ये या चित्रपटातील ज्युनिअर एनटीआरचा फर्स्ट लूक व्हिडीओ (Devara First Look Video) समोर आला आहे. अभिनेत्याचा खतरनाक अवतार पाहून चाहत्यांच्या मनात चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
देवरा चित्रपटाच्या निर्मात्यांनी 1 जानेवारीला नववर्षाच्या मुहूर्तावर घोषणा केली होती की, देवराचा फर्स्ट लूक व्हिडिओ 8 जानेवारीला रिलीज केला जाईल. प्रेक्षकांना दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ रिलीज केला आहे. 'देवरा' मधील ज्युनियर एनटीआरचा फर्स्ट लूक व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ज्युनिअर एनटीआरचा या चित्रपटातील फर्स्ट लूक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
'देवरा पार्ट 1' ची झलक टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये ज्युनियर एनटीआरच्या पात्राची झलक पाहायला मिळते. या व्हिडिओच्या शेवटी अभिनेता असे म्हणताना ऐकू येते की, 'या समुद्राने माशांपेक्षा रक्त आणि खंजीर जास्त पाहिले आहेत. कदाचित म्हणूनच याला लाल समुद्र म्हणतात.' या व्हिडीओमध्ये ज्युनिअर एनटीआर फायटिंग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्यांच्या मनातील उत्सुकता आणखी वाढली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडीओला चांगली पसंती मिळत आहे. महत्वाचे म्हणजे आता ज्युनिअर एनटीआरचे चाहते या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.
देवरा हा पॅन इंडिया अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. कोरटाला सिवा लिखित आणि दिग्दर्शित, 'देवरा' मध्ये जूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. सैफ अली खान मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही मुख्य भूमिकेत आहे. जान्हवीही 'देवरा'चित्रपटाच्या माध्यमातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको, नारायण, कलाईरासन, मुरली शर्मा आणि अभिमन्यू सिंग हे देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या पॅन इंडिया चित्रपटाचा पहिला भाग यावर्षी 4 एप्रिल रोजी तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.