दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते नागार्जुन यांच्या मुलाचा लग्न सोहळा नुकताच पार पडला आहे. अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya ) आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा लग्न सोहळा हैदराबादमध्ये पार पडला. या सोहळ्याला इंडस्ट्रीतील दिग्गज मंडळी उपस्थित होती. हे लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडले. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाचे फोटो अभिनेते नागार्जुन यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहते आणि कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभिनेते नागार्जुन (Nagarjuna) यांनी शेअर केलेल्या फोटो पोस्टला एक खास कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिलं की, "शोभिता आणि नागा चैतन्यच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली आहे. लाडक्या नागा चैतन्यला खूप अभिनंदन...तर शोभिता तुझे आमच्या कुटुंबात मनापासून स्वागत आहे. तुझ्यामुळे आमच्या घरात आनंद आला." असे लिहून आपल्या मुलाला आणि सुनेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पुढे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
शोभिताने लग्नासाठी पारंपारिक गोल्डन कांजीवरम सिल्क साडी नेसली होती. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. लूकला शोभेल असे गोल्डचे दागिने तिने परिधान केले होते. शोभिता ब्रायडल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. चाहते तिच्या लूकवर घायाळ झाले. परफेक्ट दाक्षिणात्य नवरीप्रमाणे शोभिता नटली होती. शोभिताला मॅचिंग असा लूक नागा चैतन्यने केला होता.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा ऑगस्टला पार पडला. नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न आहे. नागा चैतन्यचे पहिले लग्न साउथ स्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिच्याशी झाले होते. मात्र काही काळातच हे दोघ विभक्त झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.