मनोरंजन बातम्या

Actor Sudheer Varma Death: साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा; अभिनेता सुधीर वर्माच्या आत्महत्येने खळबळ

सुधीर वर्मा यांचे सहकलाकार असलेले अभिनेते सुधाकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Actor Sudheer Varma : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता सुधीर वर्माने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुधीर वर्माने 23 जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केली. सुधीरच्या निधनाने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा परसली आहे.

सुधीर वर्मा यांचे सहकलाकार असलेले अभिनेते सुधाकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती दिली आहे. सुधाकरने ट्विटरवर सुधीर वर्माचे अनेक फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. (Latest Marathi News)

सुधीर वर्माने उचलेल्या टोकाच्या पावलाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की सुधीर काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात होता.

टॉलिवूड अभिनेता सुधीर वर्माने 2013 मध्ये 'स्वामी रा रा' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर तो 2016 मध्ये कुंदनपू बोम्मा या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातून सुधीर वर्माला खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्यांने तेलुगू चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र त्यानंतरही अभिनेत्याला चित्रपटांच्या ऑफर्स मिळत नव्हत्या. काम न मिळाल्याने तो डिप्रेशनमध्ये गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT