KL Rahul Athiya Shetty Wedding: अबब! सुनील शेट्टीची लेक अन् जावई दोघेही कोट्याधीश; नव्या जोडीची संपत्ती पाहून बसेल शॉक

क्रिकेटपटू के एल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी यांचा विवाह सोहळा पार पडला. खंडाळ्याच्या फॉर्म हाऊसवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला.
KL Rahul Athiya Shetty Net Worth
KL Rahul Athiya Shetty Net WorthSaamtv

KL Rahul Athiya Shetty Net Worth: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या क्रिकेटपटू के एल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी यांचा विवाह सोहळा पार पडला. खंडाळ्याच्या फॉर्म हाऊसवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नाला जवळपास १०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

क्रिकेटपटू के एल राहुलकडेही अभिनेता सुनील शेट्टीप्रमाणेच करोडोंची संपत्ती आहे, पाहूया केल राहुलची वार्षिक कमाई आणि त्याची एकूण संपत्ती...

KL Rahul Athiya Shetty Net Worth
KL Rahul Athiya Shetty Wedding: शुभमंगल सावधान! अखेर आथियाने घेतली KL राहुलची विकेट; विवाहसोहळा संपन्न

राहुलकडे आहे ७५ कोटींची संपत्ती...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये के एल राहुलची (KL Rahul) एकूण संपत्ती अंदाजे 75 कोटी रुपये आहे. इतर भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे, KL च्या कमाईचा एक मोठा भाग त्याच्या BCCI करार, IPL पगार आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून येतो. त्याचबरोबर के एल राहुलचे वार्षिक उत्पन्न INR 30 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

केएल राहुलचा पगार....

केएल राहुलला बीसीसीआयने ए ग्रेड श्रेणीत अपग्रेड केले आहे आणि त्याला वार्षिक 5 कोटी रुपये दिले जातात. केएल राहुलला प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 3 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 2 लाख रुपये आणि टी-20 सामन्यासाठी 1.50 लाख रुपये मॅच फी देखील मिळते. त्याला अर्धशतक, शतक किंवा दुहेरी कसोटी शतक आणि सामनावीर/मालिका कामगिरी केल्याबद्दल कामगिरीवर आधारित रोख बोनस देखील मिळतात.

KL Rahul Athiya Shetty Net Worth
Alternanthera Sessilis : शेतीच्या बांधावर काँग्रेस गवताच्या जागी भाजप गवत फोफावलं; शेतकरी वैतागले

केएल राहुलची आयपीएलमधून कमाई....

KL राहुल हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2018 च्या लिलावातील सर्वात महागड्या भारतीय खेळाडूंपैकी एक होता, त्याला किंग्स इलेव्हन पंजाबकडून 11 कोटी रुपये रिटेनर फी मिळत होती. आयपीएल 2022 मध्ये लखनऊ सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याने 17 कोटी रुपये घेतले.

जबरदस्त कार कलेक्शन...

भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा उपकर्णधार केएल राहुलला कार चालवण्याची खूप आवड आहे. त्याच्याकडे 5 कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी हुराकन स्पायडर, 3 कोटी रुपयांची अ‍ॅस्टन मार्टिन डीबी11, 75 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ सी43, 2.7 कोटी रुपयांची ऑडी आर8, 1 कोटी रुपयांची रेंज रोव्हर वेलार आणि BMW यासह अनेक लक्झरी आणि स्पोर्ट्स कार आहेत.

आथियाची एकूण संपत्ती..

क्रिकेटपटू के एल राहुल प्रमाणेच आथिय शेट्टीकडेही कोट्यवधींची संपत्ती आहे. अथिया शेट्टीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात सूरज पांचोलीसोबत हिरो (Bollywood) या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट फारसा चालला नाही पण त्यातून अथियाला ओळख नक्कीच मिळाली.

अभिनेत्रीच्या 2022 पर्यंतच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर, तिची संपत्ती सुमारे 28 कोटी होती. त्याच वेळी,आथियाकडे अनेक ब्रँड एंडोर्समेंट्स आहेत ज्यातून ती चांगली कमाई करते. एका जाहिरातीसाठी ती 30 ते 50 लाख रुपये घेते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com