Dhanush Son Fined For Riding Superbike Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dhanush Son Yatra Fined By Chennai Police: धनुषच्या लेकाला पोलिसांनी ठोठावला दंड, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

Dhanush Son Yatra Raja News: अभिनेता धनुषचा मुलगा, यात्रा राजाला चेन्नई वाहतुक पोलिसांनी दंड ठोठावला आहे.

Chetan Bodke

Dhanush Son Fined For Riding Superbike

टॉलिवूड अभिनेता धनुष सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनेता धनुषचा मुलगा, यात्रा राजाला वाहतुक पोलिसांनी दंड ठोठावला आहे. १७ वर्षीय यात्रा राजाने वाहतुक नियमांचे पालन न केल्यामुळे, विना हेल्मेट सुपरबाईक चालवल्यामुळे त्याच्यावर वाहतुक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्यावर चेन्नईतल्या पोएस गार्डन परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओमध्ये, अभिनेत्याचा मुलगा गाईडच्या मदतीने रस्त्यावर बाईक चालवायला शिकत आहे. हेल्मेट न घातल्यामुळे आणि विना नंबरप्लेट असलेली बाईक चालवल्यामुळे धनुषचा मुलगा यात्रा राजाला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर काही वाहतुक अधिकाऱ्यांनी धनुष आणि त्याच्या मुलासोबत संपर्क साधला. त्यावेळी त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी यात्रा राजावर दंड ठोठावला आहे.

Dhanush Son Yatra Fined By Chennai Police

मिळालेल्या माहितीनुसार, धनुषच्या मुलाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी यात्रा राजावर १००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोणीही व्यक्ती असो सर्वांना नियम सारखेच, असं म्हणत नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन चेन्नईच्या वाहतुक पोलिसांचे कौतुक केले आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाहतुक पोलिसांनी यात्रा राजाची आई ऐश्वर्या रजनीकांतसोबत संपर्क साधला. त्यांच्यासोबत संपर्क साधल्यानंतर, व्हिडीओमध्ये त्यांचा मुलगा यात्रा राजाच आहे का? याची पुष्टी केली.

धनुष आणि ऐश्वर्या काही दिवसांपूर्वीच एकमेकांपासून वेगळे झाले होते. जरीही असे असले तरी, दोन्ही मुलांचा (यात्रा आणि लिंगा) यांचा सांभाळ आई- वडील दोघेही एकत्रित करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF: नोकरी बदलली? PF अकाउंट कसं ट्रान्सफर करायचं? ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

Realme 15 आणि 15 pro सिरीजची एंट्री! जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काय आहे खास

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Baramati Accident: सोन्यासारखा मुलगा आणि २ नातींचा अपघाती मृत्यू, धक्का सहन न झाल्याने आजोबांनीही सोडलं प्राण

SCROLL FOR NEXT