Traffic Rules: वाहतुक नियमांचे उल्लंघनाच्‍या वर्षभरात चार लाख कारवाया; ई-चलानचे २१ कोटी थकबाकी

वाहतुक नियमांचे उल्लंघनाच्‍या वर्षभरात चार लाख कारवाया; ई-चलानचे २१ कोटी थकबाकी
Traffic Rules
Traffic RulesSaam tv
Published On

औरंगाबाद : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात होणाऱ्या दंडात्मक कारवाईत पारदर्शकता आणि सुलभता यावी; या उद्देशाने ई चलान यंत्रणा सुरू (Aurangabad News) करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात केवळ १० टक्के दंडाचीच वसुली झाल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. (Live Marathi News)

Traffic Rules
Jalgaon News: गृहकर्जासाठी अर्ज; ७६ हजारात महिलेची फसवणूक

वाहतुकीच्‍या नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्या विरोधात वाहतुक पोलिसांकडून (Traffic Police) कारवाईचा बडगा उचलला जातो. उल्‍लंघन करणाऱ्यांना दंड देखील आकारला जातो. त्‍यानुसार वाहतुक पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर म्हणजेच मागील वर्षभरात शहर परिसरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३ लाख ९२ हजार ६०१ नियमबाह्य वाहनांवर २६ कोटी ९५ लाख ३४ हजार ४५० रुपयांचा ई-चलानद्वारे दंड लावला. मात्र, त्यापैकी केवळ १ लाख ७ हजार ६१४ चलानधारकांनी ५ कोटी ७१ लाख २२ हजार ६५० रुपये दंड भरला.

२१ कोटी दंड थकित

तर २ लाख ८४ हजार ९९० चलानधारकांनी २१ कोटी २४ लाख ११ हजार ८०० रुपयांचा भरणाच केला नाही. परिणामी दंड न भरणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ९० टक्क्यांवर पोहोचलेे आहे. यामुळे ई-चलान केवळ दिखावा असल्याचे दिसून येतय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com