Rakshita Suresh Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakshita Suresh Accident: 'पोन्नियन सेल्वन 2' मधील गायिकेचा भीषण अपघात; कार डिव्हायडरला धडकली अन् १० सेकंदातच...

'पोन्नियिन सेल्वन 2' चित्रपटाची गायिका रक्षिता सुरेशचा रविवारी सकाळी कार अपघात झाला.

Chetan Bodke

Rakshita Suresh Accident: 'पोन्नियिन सेल्वन 2' चित्रपटाची गायिका रक्षिता सुरेशचा रविवारी सकाळी मलेशियामध्ये कार अपघात झाला. यावेळी मलेशियातील रोडवरील डिव्हायडरला रक्षिताची कार जाऊन धडकली. त्यावेळी ती कारने विमानतळाच्या दिशेने जात होती. रक्षिता सुरेशने ए.आर. रहमानसोबत 'पोन्नियिन सेल्वन 2' चित्रपटामध्ये काही गाणे गायले आहेत. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर एक नोट शेअर करून या घटनेची माहिती दिली आहे.

रक्षिता सध्या मलेशियात आहे, तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना झालेल्या अपघाताची माहिती दिली आहे. अपघातावेळी तिचे संपूर्ण आयुष्य माझ्या डोळ्यांसमोरून पटकन गेले. एअरबॅगमुळे मी फार वाचली. अपघात मोठा होता, त्याच्यातून माझे बचाव होणे, ही बाब चमत्कारापेक्षा कमी नाही. पोस्ट शेअर करत ती म्हणते, "आज माझा एक मोठा अपघात झाला. मी प्रवास करत असलेली कार दुभाजकाला धडकली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. मी विमानतळावर जात असताना मलेशियामध्ये हा अपघात झाला. त्या 10 सेकंदात माझे संपूर्ण आयुष्य डोळ्यांसमोर आले." (Entertainment News)

पुढे ती लिहिते, "एअरबॅग्जमुळे आम्ही वाचलो. नाहीतर गोष्टी आणखी बिघडू शकल्या असत्या. घडलेल्या प्रकारामुळे आम्ही घाबरलो आहोत आणि इतर सहप्रवासी सुरक्षित आहेत. सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. आम्ही वाचलो." (Tollywood)

रक्षिता सुरेशने 'पोन्नियिन सेल्वन 2' मध्ये किरुनागे हे एक गाणे गायले आहे. रक्षिता सुरेशने 2009 मध्ये लिटिल स्टार सिंगर रिअॅलिटी शो जिंकला होता. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी गायली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT